जाहिरात

Boiled Amla Benefits: उकडलेला आवळा खाण्याचे 10 फायदे, शिजवलेला आवळा खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर

Boiled Amla Benefits: आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर उकडलेला आवळा खाण्याचे दहा फायदे जाणून घ्या.

Boiled Amla Benefits: उकडलेला आवळा खाण्याचे 10 फायदे, शिजवलेला आवळा खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर
"Boiled Amla Benefits: उकडलेला आवळा खाण्याचे फायदे"
Canva

Boiled Amla Benefits : आरोग्यास उपयुक्त असणाऱ्या पोषणतत्त्वांमुळे आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये आवळ्याचा समावेश केला जातो. आवळा तुम्ही कच्च्या स्वरुपात, मुरांबा किंवा त्याचा ज्युस तयार करून पिऊ शकता. पण आवळा शिजवून खाल्ल्यास आरोग्यास जास्त प्रमाणात फायदे मिळतात. आवळा उकडून खाल्ल्यास शरीरास मिळणाऱ्या दहा फायद्यांची माहिती जाणून घेऊया... 

उकडलेला आवळा खाण्याचे 10 फायदे | Boiled Amla 10 Benefits In Marathi

1. व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत

व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा 20 पट अधिक व्हिटॅमिन सी असते. उकडलेला आवळा खाल्ल्यास शरीरास दुप्पट पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते. 

2. पचनप्रक्रिया मजबूत होईल 

उकडलेल्या आवळ्याद्वारे शरीराला अधिक प्रमाणात फायबरचा पुरवठा होईल. यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्या दूर होतील. आतड्यांची स्वच्छता होईल आणि मलत्यागाशी संबंधित त्रास कमी होईल.

3. रक्त शुद्ध होईल

आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरामध्ये लाल रक्तपेशींची निर्मिती होण्यास मदत मिळेल आणि लोह शोषून घेण्याची शरीराची प्रक्रिया सुलभ होईल. उकडलेला आवळा खाल्ल्यास रक्त शुद्ध होईल आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढेल. अ‍ॅनिमियाग्रस्त रुग्णांसाठी आवळा खाणे फायदेशीर ठरेल. 

4. त्वचा चमकदार होईल

आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार होईल. यातील पोषणतत्त्वांमुळे त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होईल. सुरकुत्या, डाग, मुरुमांच्या समस्येतून सुटका होईल. त्वचेचा पोत सुधारेल.

5. केसांसाठी वरदान

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी वर्षानुवर्षे आवळ्याचा वापर केला जातोय. आवळा शिजवून खाल्ल्यास केस मजबूत होतील, केसांचे गळणे कमी होईल. केसांना पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल. 

6. रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहील

आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. मधुमेहग्रस्तांसाठी आवळा उकडून खाणे किंवा ज्युस पिणे फायदेशीर ठरेल.  

Jaggery Side Effects: या 5 लोकांनी चुकूनही खाऊ नये गूळ, होईल इतकं मोठं नुकसान; मधुमेहग्रस्तांनी गूळ खावा का?

(नक्की वाचा: Jaggery Side Effects: या 5 लोकांनी चुकूनही खाऊ नये गूळ, होईल इतकं मोठं नुकसान; मधुमेहग्रस्तांनी गूळ खावा का?)

7. वजन कमी करण्यासाठी उपयोगी

वजन कमी करायचे असेल तर डाएटमध्ये उकडलेल्या आवळ्याचा समावेश करावा. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज् प्रमाण कमी असते. फायबरमुळे शरीराची चयापचयाची गती जलद होईल.   

8. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर   

आवळ्यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची (LDL) पातळी कमी होण्यास मदत मिळेल आणि रक्तवाहिन्या देखील निरोगी राहतीत. ब्लड प्रेशरची समस्याही नियंत्रणात राहील, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

9. शरीरातील उष्णता कमी होईल

आयुर्वेदानुसार आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील उष्णता शांत होण्यास मदत मिळेल. पित्ताची समस्या असल्यास उकडलेला आवळा खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळेल.  

Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थंडी लागते? काय उपाय करावे, कोणत्या गोष्टींचे सेवन करावे?

(नक्की वाचा: Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थंडी लागते? काय उपाय करावे, कोणत्या गोष्टींचे सेवन करावे?)

10. दृष्टी सुधारण्यासाठी लाभदायक 

उकडलेला आवळा खाल्ल्यास दृष्टी सुधारेल, कारण यामध्ये कॅरोटिन नावाचे तत्त्व आहे, जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी पोषक मानले जाते. हेच तत्त्व डोळ्यांचे संसर्गापासून संरक्षणही करतात.

आवळा कसा शिजववा? | How To Boiled Amla?
  • आवळा स्वच्छ धुऊन घ्यावा.
  • पाण्यामध्ये आवळा उकळत ठेवा.
  • आवळा शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि आवळा थंड होऊ द्यावा.
  • आवळा थंड झाल्यानंतर त्यातील बी काढावी. 
  • आवळा कापून सैंधव मिठासोबत त्याचा आस्वाद घ्यावा.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com