Jaggery Side Effects: मिष्ठान्न हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सण असो किंवा एखादी आनंदाची बातमी गोड पदार्थ खाऊन हे क्षण साजरे केले जातात. दुसरीकडे हल्ली लोक आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊ लागले आहेत, त्यामुळे साखरेऐवजी डाएटमध्ये गुळाचा समावेश होऊ लागलाय. गुळामध्ये लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, ज्याद्वारे शरीराला ऊर्जा मिळण्यासह रक्तपेशी आणि हाडांनाही फायदे मिळतात.
गूळ खाण्याचे फायदे | Jaggery Benefits In Marathi
आयुर्वेदानुसार गुळातील पोषणतत्त्वांमुळे वात आणि कफ दोष संतुलित होण्यास मदत मिळते, शरीराला ऊब मिळते तसेच पचनप्रक्रिया सुधारते. गूळ लिव्हर आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. गुळाचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जाही मिळते.
गूळ खाण्याचे नुकसान | Jaggery Side Effects
1. मधुमेह
कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारकच ठरते. गूळ देखील आरोग्यासाठी पोषक असला तरीही जास्त प्रमाणात खाल्ल्यास शारीरिक समस्या उद्भवू शकतात. 100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 10 ते 15 ग्रॅम फ्रुक्टोजचे प्रमाण असते. त्यामुळे मधुमेहग्रस्तांनी गुळाचे अधिक प्रमाणात सेवन करणं धोक्याचे ठरू शकते. जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास शरीरातील रक्तशर्करा आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू शकते.

Photo Credit: Canva
2. पोटाचे संसर्ग
गुळाची गुणवत्ता देखील महत्त्वाची असते. जर गूळ अस्वच्छ वातावरणात तयार केला गेला असेल किंवा कच्च्या रसावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केली नसेल तर गुळामध्ये जंतू असू शकतात. एकूणच हा गूळ खाण्यायोग्य नसतो. परिणाम पोटामध्ये संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे चांगल्या ब्रँडच्या गुळाचा डाएटमध्ये समावेश करावा.

Photo Credit: Canva
3. अॅलर्जीकाही लोकांनी गुळाचे सेवन केल्यास अॅलर्जी होऊ शकते. जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास पोटदुखी, डोकेदुखी किंवा सर्दी-खोकला यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.
(नक्की वाचा: Health News: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे म्हातारपण लवकर येतं? सुरकुत्या कमी करण्यासाठी फॉलो करा या गोष्टी)

Photo Credit: Canva
4. लठ्ठपणाजास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास वजनही वाढू शकते. 100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 383 कॅलरीचे प्रमाण असते. यातील ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि फॅट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास वजन वाढू शकते.
(नक्की वाचा: Winter Skin Care: हिवाळ्यात नारळाचे तेल चेहऱ्यावर लावू शकतो का? त्वचेवर नारळ तेल लावल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितली माहिती)

Photo Credit: Canva
5. पचनप्रक्रियापचनाशी संबंधित समस्यांचा सामना करत असाल तर मर्यादित स्वरुपात गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. पुरेशा प्रमाणात गूळ खाल्ल्यासही पचनप्रक्रिया सुधारते, शरीराची चयापचयाची गती जलद होते आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. पण जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास शरीराची उष्णता वाढेल आणि यामुळे बद्धकोष्ठता, पोटात जळजळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Photo Credit: Canva
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world