
काही अधिकाऱ्यांची ओळख ही त्यांच्या कामाने होत असते. बेधडक काम करणारे अनेक अधिकारी आपण पाहीले आहेत. त्यांच्या कामाच्या धडाक्याची चर्चाही अनेक वेळा होते. पण काही अधिकारी त्यांच्या कृतीने चर्चेत येतात. त्या पैकीच एक आहेत अमरावती महापालिकेच्या उपायुक्त असलेल्या माधुरी मडावी. त्यांनी थेट नाल्यात उतरून साफसफाई केली. त्यांच्या या कृतीने महापालिकेतील अधिकारीही आवाक झाले. त्यानंतर शहरातल्या नालेसफाई वरून त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची शाळाच घेतली. सध्या अमरावतीत याची जोरदार चर्चा आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावती महापालिकेत उपायुक्त म्हणून माधुरी मडावी या नुकत्याच रूजू झाल्या आहेत. शहरातल्या स्वच्छते बाबत त्यांनी मोहीमच हाती घेतली आहे. आधी त्यांनी शहरातल्या अतिक्रमणा विरोधात धडक कारवाई केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शहरातल्या स्वच्छतेकडी वळवला आहे. अमरावती शहरात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्याला मुख्य कारण हे अंबा नाला आहे. या अंबा नाल्याची निट साफसफाई न केल्यामुळे शहरातल्या बराचसा भाग हा जलमय होतो.
ट्रेंडिंग बातमी - लंडनहून आणलेल्या महाराजांच्या वाघनखांचा साताऱ्यातील संग्रहालयात आज भव्य सोहळा
ही बाब माधुरी मडावी यांना खटकली. त्यांनी तातडीने अंबा नाल्याकडे कुच केली. नाल्याची स्थिती पाहून त्या स्वत:नाल्यात उतलल्या. त्या स्वत: नाल्याची साफसफाई करू लागल्या. त्यांची ही कृती पाहून त्यांच्या बरोबर असलेल्या अधिकारी हबकले. उपायुक्त मॅडम नालेसफाई करत असल्याने त्यांनाही चुकल्या सारखे झाले. त्यानंतर मडावी मॅडम यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची शाळाच घेतली.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेच्या तयारीला सुरूवात, काँग्रेस पक्षाच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका
नाल्याची साफसफाई योग्य प्रकारे झाली नव्हती. याबाबतचा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. अधिकाऱ्यांना फटकारले. शिवाय अशा पद्धतीच्या कामकाजावरही ताशेरे ओढले आहेत. शिवाय या पुढे साफसफाई योग्य पद्धतीने झाली नाही तर याद राखा असा दमही त्यांनी भरला आहे. त्यामुळे आता तरी अमरावती जलमय होणार नाही अशी अपेक्षा अमरावतीकर करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world