जाहिरात
This Article is From May 10, 2024

भेंडवळची घटमांडणी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी, विद्या सिद्ध करणाऱ्यास अंनिसकडून 50 लाखांचं बक्षिस जाहीर

शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात.

भेंडवळची घटमांडणी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी, विद्या सिद्ध करणाऱ्यास अंनिसकडून 50 लाखांचं बक्षिस जाहीर

अमोल गावंडे,बुलढाणा

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणी निव्वळ शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करणारा प्रयोग आहे. लीलावती विद्येचा दावा खोटा असून ही विद्या सिद्ध करणाऱ्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून 25 लाख व 25 लाख वैयक्तिक असं 50 लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुलडाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची पंरपरा आहे. ही घटमांडणी सुमारे 370 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात होणारी घटमांडणी विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्यासाठी पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवते. 

( नक्की वाचा- मोठा बातमी! अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर)

शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. घटमांडणीचे भाकित घेऊन शेतकरी पुढील हंगामाची पेरणी काय करायची, ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येतो. पावसाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणत आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.

(नक्की वाचा- राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं; राजकीय नेत्यांनाही फटका)

आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी या घटमांडणीवर थेट आरोप करत त्याला थोतांड म्हटलं आहे. मांडणीच्या माध्यमातून जाहीर केलेली भविष्यवाणी अनेक वेळा खोटी ठरलेली आहे. या घटमांडणीच्या आहारी जाऊ नये असं, आवाहन देखील रघुनाथ कौलकर यांनी केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com