Maharashtra Live Blog: आज 21 जून रोजी (आंतरराष्ट्रीय योग दिन 2025) भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. योग आता जागतिक स्तरावर एक जनचळवळ बनली आहे. दहा वर्षांपूर्वी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता मिळाल्याने यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुसरीकडे आषाढी वारीतील मानाच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. आज पुण्याच्या नाना पेठेतील मुक्कामानंतर दोन्ही पालख्या सासवडमार्गे पंढरीकडे रवाना होतील.
Live Update : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत चुकीची आकडेवारी जाहीर
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्याकडून मोठी चूक झाली आहे. आज दिवसभर पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि 29 फुटांवर पोहोचली अशी आकडेवारी देण्यात आली. 29 फुटांवर पोहोचल्यानंतर नदीच पाणी पात्रा बाहेर पडत. मात्र संध्याकाळपर्यंत नदीचे पाणी पात्राच्या आत मध्येच होतं. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे.
Live Update : शेगावकरांना मिळणार 24 तास पाणी, काम अंतिम टप्प्यात
शेगाव शहराचा सर्वांगीण विकास अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या शहरातील सर्व मार्ग हिरवेगार दिसतील, याशिवाय या शहराला दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था कार्यान्वित केली जात असल्याची माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी दिली. शेगाव नगरपालिकेत आज शनिवारी आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Live Update : हेंडिग्ले टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पंतची दमदार सेंच्युरी, टीम इंडिया भक्कम स्थिती
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात हेंडिग्लेंमध्ये टेस्ट मॅच सुरु आहे. या टेस्टचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये ऋषभ पंतनं दमदार सेंच्युरी झळकावली आहे. या टेस्टमध्ये सेंच्युरी करणारा ऋषभ तिसरा भारतीय बॅटर आहे. यापूर्वी यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलनं देखील सेंच्युरी झळकावली होती.
Live Update : रायगड जिल्ह्यात 3 अल्पवयीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेणसे गावाजवळील सिद्धार्थ नगर परिसरात दुर्दैवी घटना समोर आली असून पाण्याच्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
अश्फाक अन्सारी वय (16), मिझान जाकीर अत्तर वय (14) आणि जोहेब जाकीर अत्तर वय (17) अशी या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. तिघेही एकाच मोहल्यातील असून यातील दोघे जोहेब आणि मिझान हे सख्खे भाऊ आहेत.
पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले परंतु घटना कळताच ग्रामस्थानी त्यांना बाहेर काढले. त्यांना नागोठणे येथील शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वडखळ संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले होते. पण, या उपचारात आज त्यांचा मृत्यू झाला.
Live Update : कृष्णा नदीची पातळी वाढली, नृसिंहवाडीमध्ये दत्त मंदिरासमोर पाणी पोहोचलं
कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात तीन फुटाने वाढ झाली आहे. या वाढलेल्या पाणी पातळीमुळे दत्त मंदिरासमोर पाणी पोहोचलेला आहे. धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गामुळे या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यात सुरू असलेल्या या पावसाचे प्रमाण दरवर्षीपेक्षा जास्त आहे. सरासरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला येथील दत्त मंदिरात पाणी येत असते. यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्याने जून महिन्यामध्येच येथील दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचले आहे.
Nashik News: नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ
- जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
- नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठा 42 टक्क्यांवर
- जिल्ह्यातील 6 धरणांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा
- नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 66 टक्के भरले
- गंगापूर धरणातून विसर्गात वाढ, 12 वाजता 2320 क्यूसेकने विसर्ग सुरू
- दारणा आणि गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मराठवाड्यालाही मिळणार मोठा दिलासा
LIVE Updates: आगामी निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात, अहेरीत काँग्रेसची रणनीती बैठक संपन्न
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान, जिल्ह्याचे निरीक्षक अॅड. सचिन नाईक, तसेच
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली व सिरोंचा तालुक्यातील विविध काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.
LIVE Updates: कोरेगाव भीमा – पेरणे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटला
- पुणे जिल्ह्याच्या शिरूर आणि हवेली तालुक्याला पाणीपुरवठा करणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हरफुटला आहे. कोरेगाव भीमा आणि पेरणे दरम्यानच्या भीमा नदीवरील हा बंधारा अचानक फुटल्याने शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे. तब्बल ४४५७ एकर शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि उद्योगधंद्यांचे भवितव्य धोक्यात आलं आहे.यापूर्वी अनेकदा येथील गावकऱ्यांनी हा बंधारा दुरुस्त करण्याची मागणी केली होती मात्र त्यांच्या या मागणीला सबंधित प्रशासनाने केराची टोपली दाखवली होती.ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.आता तातडीने नवीन बंधारा बांधण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
LIVE Updates: जागतिक योग दिनानिमित्य नागपूर येथे पाण्यात योगासनाचे आयोजन
- आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने नागपुरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग तर्फे स्विमिंग विथ योग करण्यात आला...
- यामध्ये 4 वर्षापासून ते 65 वर्षाच्या वयोवृद्ध स्वीमर यांनी सहभाग नोंदवला.. सुदृढ शरीर आणि आरोग्यासाठी योग्य अभ्यास महत्वाचा आहेय.
- यातच योग अभ्यास तो ही पाण्यात करून, विविध आसन मुलांनी केले...
- पाण्यामध्ये उभे राहून योगासने केल्याने मनातील स्थिरता आणि लवचिकता वाढवण्यास मदत होते...या सोबतच योगासने केल्याने मन शांत होते या अनुषंगाने ह्या योगा अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
- नागपुरातील डोळ्याने अधू असलेली योग अभ्यासिका ईश्वरी पांडे हिने सुद्धा पाण्यात योग केला...
LIVE Updates: अतिक्रमणाच्या कारवाईनंतर नागरिक आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडताच अॅक्शन मोडवर आलेल्या पोलिस आणि मनपा प्रशासनाने सलग सात तासांत २२९ अतिक्रमणे भुईसपाट केली. ५०० पोलिस आणि १५० मनपा कर्मचा-यांनी दुपारी साडेबारा वाजता सुरु केलेली ही ऐतिहासिक अतिक्रमण हटाव मोहीम साडेसात वाजता थांबवण्यात आली. मात्र याच कारवाईच्या विरोधात आज मुकुंदवाडी परिसरात आंदोलन केला जात आहे.
LIVE Updates: आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही: CM देवेंद्र फडणवीस
कुठल्याही परस्थितीत आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही, त्याबाबतच्या आरक्षण उठवण्यात सांगितले आहे,आळंदी मध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही.
राज्यातील धरणातील पाण्याबाबत आणि पावसाच्या पाण्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत, कधी विसर्ग सोडायचा कधी कमी करायचा, बाजूच्या नात्यांमध्ये आमचे बोलणे सुरू आहे.योग्य बोलणे सुरू आहेत.
LIVE Updates: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप आहे.. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 26 फुटावर आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर आहे.. गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाचे प्रमाण आजरा तालुक्यामध्ये आहे. आजऱ्यातील धनगरवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.. जिल्ह्यातील एकूण 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरण जूनमध्येच 60 टक्के भरल्याने ऐन पावसाळ्यात महापुराची स्थिती काय होईल याचा लोकांनी आतापासूनच धसका घेतला आहे.
LIVE Updates: जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली
जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली
जायकवाडी धरणात सद्या 14 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू
जायकवाडी धरणात सद्या 31.18 टक्के पाणीसाठा
एक दिवसांत दीड टक्के पाणीसाठा वाढला
LIVE Updates: छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा 14 तास बंद
छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा 14 तास बंद
वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनीच्या उर्वरित कामांसाठी १२ ते १४ तासांचा पाणीपुरवठा शटडाऊन
जायकवाडी आणि ढोरकीन परिसरात कामं करण्यात येत आहे
शहर व सिडको भागात पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिरा होण्याची शक्यता
मुख्य शहरातील पाण्याचे टप्पेही पुढे जाऊ शकतात
नागरिकांनी सहकार्य करण्याचे मनपातर्फे आवाहन
LIVE Updates: पश्चिम रेल्वेची दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत
पश्चिम रेल्वेची दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत
रात्री 12.45 वाजता ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वाहतुक सुरु..
तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अप आणि डाऊन मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह लोकल सेवा सुरळीत सुरू.
पालघर येथे ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा झाली होती ठप्प
ओव्हरहेड वायर तुटलेल्या अजमेर एक्सप्रेसला डिझेल इंजिनच्या सहाय्याने दुसऱ्या ट्रॅक वर नेल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश.
Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिन.. PM मोदींचा विशाखापट्टणमध्ये योगाभ्यास
आज सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत भारतातील 1 लाखाहून अधिक ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिके आयोजित केली जातील. पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आहेत. पंतप्रधान येथे योगावरील राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. योग दिनानिमित्त, सरकारने लोकांपर्यंत सहज पोहोचता यावे म्हणून 10 कार्यक्रम जाहीर केले आहेत.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh attends #InternationalYogaDay celebrations in Udhampur
— ANI (@ANI) June 21, 2025
He says, "The whole world saw how our forces showed wisdom and destroyed only those targets which were the fortresses of terrorist activities. If we wanted, we could have wiped out… pic.twitter.com/v2LepzOgjO
LIVE Updates: उबाठा गटाची डिनर डिप्लोमसी पार पडली
उबाठा गटाची पार पडली डिनर डिप्लोमसी
बैठकीत उद्धव ठाकरेंनी दिले आमदार खासदारांना कानमंत्र
आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना राज्यातील मुद्दे घेऊन कसे कोंडीत पकडायचे यावर मंथन
मनसे युती संदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्या सुचना
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आता लक्ष केंद्रित करा त्या अनुषंगाने बांधणी करुन कामाला लागा
युती होईल किंवा होणार नाही मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा
LIVE Updates: ट्रॅक्टर - दुचाकी विचित्र अपघात, एक जण जखमी
सटाणा - मालेगाव रोडवर आघार येथील मोरीवाजवळ दुचाकीस्वार ट्रॅक्टरवर जावून धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर पगारे गंभीर जखमी झाला आहे.मोटार सायकल अक्षरश: ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मधोमध जावून अडकली होती.स्थानिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले.