जाहिरात

Beed News : मराठा-ओबीसी संघर्ष टोकाला; विजय वडेट्टीवारांनी सांगितलं मुलांच्या शिक्षणावर कसा होतोय परिणाम

Vijay Wadettiwar on Maratha-OBC conflict : सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिले नाही

Beed News : मराठा-ओबीसी संघर्ष टोकाला; विजय वडेट्टीवारांनी सांगितलं मुलांच्या शिक्षणावर कसा होतोय परिणाम

संजय तिवारी, नागपूर

मराठा विरुद्ध ओबीसी असं बीडचं राजकारण झालं आहे. शाळांमधून मुलांना काढण्याचं काम सुरू झालं आहे. मराठवाड्यात मराठ्यांची शाळा असली तर ओबीसींचे मुले नाव काढत आहेत. तर ओबीसींच्या असेल तर मराठा मुले नाव काढत आहेत. हे जे चाललंय ते भयानक चाललेलं आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.  

राजकीय वाद सामाजिक स्तरावर गेलेला आहे. सरकारला कायदा सुव्यवस्थेचे देणं घेणं राहिलं नाही. फक्त आपल्या माणसाला मदत करा, महाराष्ट्रातील बीड किंवा दोन-तीन जिल्ह्यात आता इतका टोकाचं वातावरण दोन्ही समाजाने उचललेला आहे. सरकारचं याकडे लक्ष दिसत नाही. हा उद्रेक महाराष्ट्राच्या हिताचा नाही आणि पुरोगामी विचाराच्या दृष्टीने भविष्यात अत्यंत भयानक स्थिती होण्याची भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. 

सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिले नाही आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही. एखादी मोठी घटना होईल त्यावेळी हजारो लोकांना आपला जीव गमावा लागेल, अशी परिस्थिती बीडमध्ये आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: