गणपती विसर्जन मिरवणूक बघत असताना अचानक छत कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहाण्यासाठी एका जिर्ण छतावर महिला मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. त्याच वेळी मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सुरू होता. त्यावेळी अचानक हे छत कोसळले. त्यामुळे छतावर असलेल्या तीस ते चाळीस महिला खाली कोसळल्या. त्याचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. यात या तीस ते चाळीस महिला जखमी झाल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जीर्ण इमारतीवर काही महिला एकत्र आल्या होत्या. विसर्जनातील डीजे व झाक्यांचा आनंद घेत मिरवणूक सुरू होती. त्याच वेळी अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळले. त्यात तीस ते चाळीस महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे घडली आहे. जखमींमध्ये अनिता राजेंद्र सोनवणे वय 45, मिना टिळ्कशिंग बैस वय 40, नंदिनी सुरेश शेंद्रे वय 30, अर्चना विजय देव्हारे वय 40 रिया रेवाचंद शेंद्रे वय 15 यांच्यासह तीस ते चाळीस महिला असून त्यांना किरकोळ मार लागला आहे.
बारव्हा पेठ येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे वतीने गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दहा दिवस विविधरंगी कार्यक्रम साजरे करण्यात आले. विसर्जनासाठी डीजे व विविधरंगी झाकी, लेझीमच्या तालावर भाविक भक्त थिरकत विसर्जन मिरवणूक निघाली होती. अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळले. पत्र्याच्या शेडखाली अनेक महिला उभ्या होत्या. त्यांच्यावर त्यांच्यावर शेड कोसळले. मात्र सिमेंटच्या छताखाली पत्र्याचे शेड असल्यामुळे नऊ महिला किरकोळ जखमी झाल्या आहे. हे शेड कोसळल्यानंतर जमावाने सर्व शेड उचलून धरले.
ट्रेंडिंग बातमी - एक देश एक निवडणूक! राज ठाकरेंनी उपस्थित केले प्रश्न अनेक
त्यानंतर यात जे जखमी झाले होते त्यांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे दाखल करण्यात आले. अनिता रवींद्र सोनवाने, रिया रेवाचन शेंद्रे, नंदिनी सुरेश शेंद्रे, या महिला व मुलींना जास्त मार असल्यामुळे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात हे छत कोसळताना दिसत आहे. त्यात महिला या खाली पडताना दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world