जाहिरात

"मारुन टाकेन" शब्द माझे नाहीत, मालवणमधील राड्यावर नारायण राणेंचा यू टर्न

विधानसभा निवडणुकीवर या सर्वाचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवरायांचा पुतळा कुणी पाडलेला नाही, तो पडला आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

"मारुन टाकेन" शब्द माझे नाहीत, मालवणमधील राड्यावर नारायण राणेंचा यू टर्न
सिंधुदुर्ग:

राहुल कुलकर्णी

मालवणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर बुधवारी 28 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीचे नेते पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्याठिकाणी राणे समर्थक आणि शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूने झाली. काही काळ तिथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाळं. कालच्या राड्यानंतर नारायण राणे यांना NDTV मराठी सोबत खास संवाद साधला आणि तिथे नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती दिली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली. आम्ही तिथे पाहणी करण्यासाठी गेलो होतो. पाहणी करून परतत असताना ठाकरे गटाचे लोक वाटेत समोर आले आणि आमच्या अंगावर आले. दरम्यान समोरुन घोषणाबाजी सुरु होती. ठाकरे गटाने अतिरेक केला म्हणून आम्ही 2 तास त्यांना जाऊ दिलं नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

नारायण राणेंचा यू टर्न

"घरातून खेचून मारुन टाकेन" या वक्तव्यावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, मी असं काही म्हटलंच नाही. मारेन शब्द माझा नाही. बाहेर जाऊ देणार नाही असं मी म्हणाले. मारेन मी कशाला बोलेन तिथे बरेच मार्ग होते. जवळ समुद्र होता, कठडा होता. 

जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत. संपूर्ण गोंधळ सुरु असताना जयंत पाटील माझ्याशी बोलायला आले. मी त्यांना म्हटलं थोडं थांबा मार्ग निघेल. मात्र कुणी मस्ती केली तर मी मागे हटत नाही, असं नारायण राणे यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा - शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी!)

आगामी निवडणुकीवर परिणाम होईल का? 

विधानसभा निवडणुकीवर या सर्वाचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवरायांचा पुतळा कुणी पाडलेला नाही, तो दुर्दैवाने पडला आहे. पुतळा कशामुळे पडला आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल. संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल. सरकार लवकरात लवकर पुतळा देखील उभारेल. माझं सगळ्यांशी बोलणं झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. आम्ही फक्त पोटापाण्यासाठी हिंदुत्व आणि महाराजांच्या नावाचा उपयोग नाही केला. आम्ही त्यांचा स्वाभिमान जोपासला, असा टोला देखील नारायण राणे यांनी ठाकरेंना लगावला. 

( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )

ठाकरे माणसात उशीरा आले

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पाहिली नाही. आम्ही शिवसेना नावारुपाला आणल्यानंतर हे आले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे जागे झाले. तोपर्यंत फोटो, जंगल सफारी करत होते. ठाकरे माणसात फार उशीरा आले, तोपर्यंत जंगलातच होते, असा टोलाही नारायण राणे यांना लगावला. 

देशाच्या, राज्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्धव ठाकरेंसारखं मातोश्री एके मातोश्री असं गल्लीत आम्ही स्थिमित नाहीत. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना हे दोन दिवस फक्त मंत्रालयात गेले. आमच्या प्रत्येक योजनेवर टीका करतात. तुम्ही काय केलं ते सांगा, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा लैंगिक छळ, नायर रुग्णालयाच्या प्राध्यापकाचे निलंबन
"मारुन टाकेन" शब्द माझे नाहीत, मालवणमधील राड्यावर नारायण राणेंचा यू टर्न
Inside Story shridhar naik murder 30 years ago  What is Narayan Ranes connection
Next Article
Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे