
प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
भाऊबीजेच्या दिवशी नंदुरबारमधील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे. जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा आणि मोटरसायकलींचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार रात्री नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावापासून 1 किमी अंतरावर एक मोटरसायकल नादुरुस्त झाली होती. अंधार असल्याने दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी अजून दोन दुचाकी त्या ठिकाणी थांबल्या होत्या. त्यावेळी नंदुरबारहून धानोराकडे भरधाव वेगात जाणाऱ्या बोलेरो वाहन चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलसह नागरिकांना चिरडले.
(नक्की वाचा- दारुड्या नवऱ्याची रोजची कटकट; संतापलेल्या बायकोने कापलं गुप्तांग)
या भीषण अपघातात योगेश कालूसिंग नाईक (40), राहुल धर्मेंद्र वळवी (26), अनिल सोन्या मोरे ( 24), चेतन सुनील नाईक (12 ), श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे (40 ) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर तिघांच्या मोटरसायकलचा चक्काचूर झाला. तर बोलेरो गाडीही उलटली होती.
गावकऱ्यांच्या मदतीने गाडी सरळ करण्यात आली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. ऐन दिवाळीत एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघाच्या ठिकाणी पोलीस दल दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
(नक्की वाचा- पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पत्नीकडून साफ करुन घेतला बेड; मध्य प्रदेशातील संतापजनक प्रकार)
अमरावतीत दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
वाशिमच्या कामरगावजवळ रात्री 2 वाजताच्या सुमारास दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये रॉयल ट्रॅव्हल्सचा चालक श्रीधर कायवाडे हा जागीच ठार तर 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. शब्रिज आणि रॉयल ट्रॅव्हल्समध्ये ही भीषण धडक झाली. दोन्ही ट्रॅव्हल्समधील जखमींना अमरावतीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world