जाहिरात
This Article is From Aug 18, 2024

चालकाला हृदयविकाराचा झटका, भरधाव कार अनियंत्रित झाली; पुढे भयंकर घडलं...

Nandurbar Accident : कारने रस्ताने सायकलवरुन जाणाऱ्या एका 60 वर्षीय भंगार विक्रेत्याला जोरदार धडक दिला. त्यात त्याचा जागीच मुत्यू झाला. तर रस्त्याने पायी जाणाऱ्या आई आणि मुलाला देखील कारने धडक दिली.

चालकाला हृदयविकाराचा झटका, भरधाव कार अनियंत्रित झाली; पुढे भयंकर घडलं...

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

नंदुरबारमध्ये एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. वाहनचालकाचा धावत्या गाडीत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. धावत्या गाडीत वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कार देखील अनियंत्रित झाली. त्यानंतर भरधाव कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या चौघांना उडवलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारने रस्ताने सायकलवरुन जाणाऱ्या एका 60 वर्षीय भंगार विक्रेत्याला जोरदार धडक दिला. त्यात त्याचा जागीच मुत्यू झाला. तर रस्त्याने पायी जाणाऱ्या आई आणि मुलाला देखील कारने धडक दिली. दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!)

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मिराज सिनेमा ते कोकणी हिल परिसरात ही घटना घडली. वाहन चालक तारीख खान त्यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यानंतर अनियंत्रित कारने सायकलवरून जात असलेल्या रज्जाक खान यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

(नक्की वाचा- Kolkata Doctor Case : 'एका रात्रीत आमचं सगळं संपलं", पीडित डॉक्टर तरुणीच्या आई-वडिलांचा आक्रोश)

तर मनिषा पवार आणि 12 वर्षीय गोलू पवार हे गंभीररित्या जखमी झाले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: