जाहिरात

वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात? देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; कारणही सांगितलं

वाढलेला टक्का कुणाचे पारडे जड करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे.

वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात? देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; कारणही सांगितलं

संजय तिवारी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाने सर्वच राजकीय पक्षांची धाकधुक वाढवली आहे. राज्यभरातील मतदारांनी उस्फुर्तपणे सहभाग घेत आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण ६५.१ टक्के मतदान झाले.  हा वाढलेला टक्का कुणाचे पारडे जड करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'महाराष्ट्रात  मतदान वाढले आहे, टक्केवारी वाढली आहे. आजवरचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षालाला त्याचा फायदा होतो. मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल,' असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

'महिलांचे मतदान वाढला आहे असे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. मी काही मतदारसंघात संपर्क केले तिथून मला फीडबॅक मिळाला आहे की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे.  लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही,' असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा: विदर्भात मतदानाच्या दिवशी हिंसक घटना, उमेदवारावर जीवघेणा हल्ला; नागपुरात सर्वात कमी मतदान

मुख्यमंत्रीपदाबाबत अजून काहीही चर्चा नाही. परवा निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करू. मला असं वाटतं की मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे, त्यामध्ये प्रो इनक्यूबेंसी फॅक्टर आहे. लोकांना सरकारबद्दल थोडी आपुलकी वाटते असं त्याचा अर्थ आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अद्याप कोणत्याही अपक्षाशी संपर्क साधला नसल्याचेही ते म्हणाले. 

काँग्रेसचाही सत्तास्थापनेचा दावा

दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 75 जागा मिळतील आणि महाविकास आघाडी सरकारच सत्तेतील असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एक्झिट पोल काय दाखवतात यापेक्षा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. नांदेडमध्ये ते बोलत होते. 

नक्की वाचा: 'प्रणिती शिंदे विश्वासघातकी, तुझ्या बापालाही...', काँग्रेस- ठाकरे गटात वाद पेटला

Listen to the latest songs, only on JioSaavn.com