सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापूरमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का देत अपक्ष उमेदवाराला साथ दिली. मतदानाच्या दिवशीच काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदेंच्या या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त करत सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काँग्रेसने सोलापूर दक्षिणच्या जागेवर सांगली पॅटर्न राबवत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. सोलापूर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी
दिली होती. मात्र काँग्रेसकडून अमर पाटील यांच्या प्रचारार्थ उत्साही सहभाग घेतला नव्हता. अशातच आज मतदानाच्या दिवशीच सुशिलकुमार शिंदे- प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. या पाठिंब्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त केला तसेच जोडे मारो आंदोलनही केले.
नक्की वाचा: लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट! राजकीय राडे, मारहाणीच्या घटना, कुठे काय घडलं?
यावेळी बोलताना शरद कोळी यांनी शिंदे पिता- पुत्रीवर सडकून टीका केली आहे. लोकसभेवेळी प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी बूट चाटण्याचे काम केले. उद्धव साहेबांना विनंती काँग्रेसवाल्यांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे. प्रणिती शिंदे तुलाच काय, तुझ्या बापाला देखील आम्ही भीत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, असं ते म्हणाले.
तसेच प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात फिरून दाखवावं, तिच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही.प्रणिती शिंदे यांचं नाव घेण्याच्या लायकीची नाही ती विश्वासघातकी आहे. गल्लीतल्या मंडळाचे अध्यक्ष होण्याची देखील योग्यता प्रणिती शिंदे यांची नव्हती मात्र उद्धव ठाकरेंमुळे त्यांना ही संधी मिळाली, असे म्हणत शरद कोळी यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाची बातमी: राज ठाकरे किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा? एक्झिट पोल काय सांगतात?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world