
एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती. मेहनत करुन ही हक्काचा पगार मिळाला नाही. त्यामुळे महिन्याचं बजेट पूर्ण कोलमडलं. कुणाचे बँकेच हाफ्ते चुकले, तर कुणाची आर्थिक कोंडी झाली. इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत आणि पूर्ण होता. मग एसटी कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं अशी प्रतिक्रीया उमटत होत्या. शेवटी सरकारने आता त्यावर तोडगा काढला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीन तोडगा काढण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पूर्ण पगार न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. गुरूवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. त्यांनी पगार झाला नाही ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. आपले उर्वरित वेतन लवकरच द्यावे, अशी मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल शिंदे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांवरिल वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.
राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ तोट्यात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे एसटीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण पडत आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. त्यामुळे महामंडळाला राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावं लागत आहे. राज्य सरकार कडून मदत आल्यानंतरच पुढील प्रक्रिया होतात. अनेक वेळा पगार उशिरा होतात. तर कधी होतच नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यात एसटीला फायद्यात आणण्याचे अनेक प्रयत्न झाले.पण त्यात तेवढे यश आले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world