
राकेश गुडेकर, रत्नागिरी
Ratnagiri News : महाराष्ट्राला मुंबईपासून ते तळकोकणापर्यंत विस्तीर्ण समुद्राकिनारा लाभला आहे. तरी देखील महाराष्ट्रातील किंवा देशभरातील पर्यटकांचा रीघ ही गोवा, केरळ आणि इतर किनारपट्ट्यांकडे तुलनेने जास्त आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने आता पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्याचा काम सरकारने हाती घेतलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, आरे-वारे, आंबोळगड, कशेळी या समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे 4 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामामुळे गोवा, केरळच्या धर्तीवर रत्नागिरीत समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)
रत्नागिरीला अथांग समुद्रकिनारे लाभले असले तरीही अनेक ठिकाणी अपेक्षित विकास झालेला नाही. किनाऱ्यांची स्वच्छता व्हावी, यासाठी काही कंपन्यांनी किनारे दत्तक घेऊन त्याची स्वच्छता केली जाते. परंतु कंपन्यांकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होतं. तसेच किनाऱ्यावर जाण्यासाठी जोडरस्ते, स्वच्छतागृह, वाहने उभी करण्यासाठी जागा, माहिती फलक आदी सुविधा नाहीत. पायाभूत सुविधांची वानवा असल्याने याठिकाणी येणारा पर्यटक पुन्हा येण्यास तयार होत नाही. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होत आहे.
(नक्की वाचा- Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप)
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ही पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे पायाभूत सुविधांतर्गत कामे सुरू झाली आहेत. त्यासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
यामध्ये भाट्ये किनारी जोडरस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे उभारली जातील. आरे-वारे आणि आंबोळगड, कशेळी, अणसुरे या किनाऱ्यावरही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. प्रत्येकी सुमारे एक कोटीची कामे आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीतील किनारी पर्यटनात मोठी वाढ होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world