Mumbai Taxi Driver Rap Channel QR Code: 'आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काहीही करू शकतात,' ही म्हण मुंबईच्या (Mumbai) एका टॅक्सी चालकाने (Taxi Driver) पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे. या वडिलांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी निवडलेला अनोखा मार्ग सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे. या टॅक्सी चालकाने आपल्या गाडीत असा काही क्यूआर कोड लावला आहे की, स्कॅन करणारेही भावुक झालेत. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा...
टॅक्सी ड्रायव्हरची भन्नाट आयडिया
स्वप्नांची नगरी मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर सध्या त्याच्या पुत्रप्रेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या टॅक्सी चालकाने आपल्या टॅक्सीच्या पुढील सीटच्या (Front Seat) मागे एक क्यूआर कोड लावला होता. दिव्युषी (@divyushii) नावाच्या एका महिला प्रवाशाला हा कोड दिसला, तेव्हा त्यांना तो पेमेंटसाठी (Payment) असेल असे वाटले. पण जेव्हा त्यांनी चालकाला विचारले, तेव्हा मिळालेल्या उत्तराने त्यांना आश्चर्यचकित केले.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतल्या राम मंदिरासाठी भक्तांनी किती दान केलं? रक्कम ऐकून डोळे फिरतील
तो क्यूआर कोड पेमेंटचा नसून, त्यांच्या मुलाच्या यूट्यूब रॅप चॅनलचा (YouTube Rap Channel) होता, म्हणजे, जेव्हा-जेव्हा गाडीत नवी सवारी बसायची, तेव्हा त्यांच्या मुलाच्या चॅनलला एक नवा व्ह्यूअर (Viewer) मिळायचा. प्रवाशी दिव्युषी यांनी ही कथा एक्स वर फोटोसहित शेअर केली आणि काही क्षणातच ती व्हायरल झाली. दिव्युषी यांनी पोस्टमध्ये लिहिले, "ते काही मोठे श्रीमंत नव्हते, ना जास्त शिकलेले, पण त्यांच्याजवळ जे काही होते, त्याचा त्यांनी उत्तम वापर केला. त्यांनी आपल्या टॅक्सीला 'फिरते प्रमोशन चॅनल' (Mobile Promotion Channel) मध्ये रूपांतरित केले."
नेटकऱ्यांकडून कौतुक
सोशल मीडिया युजर्सने वडिलांच्या या समजूतदारपणाचे आणि प्रेमाचे जोरदार कौतुक केले आहे. एका युजरने "हे खरे मार्केटिंग आहे," असे लिहिले, तर दुसऱ्याने, "मुलासाठी वडिलांचे हे प्रेम मन जिंकून घेणारे आहे," अशी भावना व्यक्त केली. अनेकांनी या पोस्टला 'मुंबई स्पिरिट'चे (Mumbai Spirit) उत्तम उदाहरण मानले आहे. "मुंबई तुम्हाला विनम्र बनवते आणि प्रेरणाही देते.
Gold News: RBI ने परदेशातील 64,000 किलो सोने भारतात का परत आणले? वाचा सविस्तर!
येथे लोक मर्यादित साधनांतूनही मोठी स्वप्ने पाहतात. हीच खरी मुंबई आहे," असे एका युजरने लिहिले आहे. या टॅक्सी चालकाने आपल्या टॅक्सीद्वारे केवळ रॅप चॅनलचे प्रमोशनच केले नाही, तर 'बापमाणूस' म्हणून समाजाला एक मोठा संदेशही दिला आहे. या व्हायरल टॅक्सीवाल्या बापमाणसाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world