जाहिरात

'मनोज जरांगे बावळट...', लक्ष्मण हाकेंची जहरी टीका, महायुतीकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी

जिथे सभा घेतल्या तिथे भरभरुन मते मिळालीत, अशी टीका करत द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या, विधानपरिषद वगेरे नको, ओबीसी चळवळीला चिल्लर समजू नका,' असा इशाराती त्यांनी यावेळी दिला. 

'मनोज जरांगे बावळट...', लक्ष्मण हाकेंची जहरी टीका, महायुतीकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी

रेवती हिंगवे, पुणे: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीची अक्षरश:धुळधाण झाली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पॅटर्न फ्लॉप ठरल्याने आणि ओबीसी एकवटल्याने मविआला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. महायुतीच्या या विजयानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली.तसेच महायुती सरकारकडे त्यांनी मंत्रीपदाचीही मागणी केली आहे. 

काय म्हणालेत लक्ष्मण हाके? 

मनोज जरांगे पाटील यांना लोक कंटाळले आहेत. त्यांनी 130 जागा पाडायची भाषण केली, जिथं मेसेज दिला तिथं लोक मोठ्या मताधिक्याने लोक निवडून आले आहेत. जरांगे खोटं बोलत आहेत. मी जिथं सभा घेतल्या तिकडे चांगली उमेदवारांना मत पडली आहेत.आता मनोज जरांगेंवर ही शेवटची पत्रकार परिषद घेत आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. 

नक्की वाचा: उद्यापर्यंत शपथविधी झाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल? कायदा काय सांगतो?

'खुळचट बावळट जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेला पाडलं, लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगे यांना चपराक आहे, आम्ही ओबीसीला जवळ म्हणणारी माणसे आहेत. मी जाहीर भूमिका घेतली होती महायुतीची सुपारी. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा ते म्हणत होते मी जरांगे मुळे निवडून आलो. मला विधान परिषद काय कॅबिनेट मंत्रीपद हवे आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रीयमंत्रीपद काहीतरी  द्यायला हवे. मी अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व करतोय. अशी सर्वात मोठी मागणीही त्यांनी केली आहे.

'राजेश टोपे नावाचा माणूस पडला याचा मला आनंद आहे. रोहित पवारचेही आम्ही कान कापलेत. आम्ही उघडपणे महायुतीचे काम केले. आता कोणीही मुख्यमंत्री व्हावे, आम्ही आमचे काम केले आहे. मी महायुतीची जाहीर भूमिका घेतली. जरांगेंनीही शरद पवार यांची भूमिका घेतली होती. मी जिथे सभा घेतल्या तिथे भरभरुन मते मिळालीत, अशी टीका करत द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या, विधानपरिषद वगेरे नको, ओबीसी चळवळीला चिल्लर समजू नका,' असा इशाराती त्यांनी यावेळी दिला. 

महत्वाची बातमी: 'Miss You Boss' नाशिकमध्ये झळकले बॅनर, तरुणाची भररस्त्यात क्रूरपणे हत्या; नागरिकांनी आंदोलन पुकारलं

Listen to the latest songs, only on JioSaavn.com