जाहिरात
9 months ago
मुंबई:

Legislative Monsoon Session : आज राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनचा दुसरा दिवस. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.  27 जून 2024 पासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात झाली असून 13 जुलैपर्यंत अधिवेशन सुरू राहील. दुसरीकडे आतापर्यत दडी मारलेल्या पावसाने काल 27 जूनपासून मुंबईत बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिवेशनाबरोबरच पावसाचा (Maharashtra Rain Update) मुद्दाही महाराष्ट्रात गाजणार असल्याचं दिसत आहे.  

विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात...

विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात...

अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. यांनी कितीही फसवण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्राला बळी पडणार नाहीत. या अर्थसंकल्पातून नागरिकांची धुळफेक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेटून खोटं बोलायचं हेचं यांचं काम आहे. आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर आणि सर्वच घटकाला आपल्या सोबत घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आमची मागणी आहे की, आजपर्यंत केलेल्या घोषणांपैकी किती अमलात आणल्या यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. राज्यातील हजारो तरूण बेकार असताना त्यांच्यासाठी रोजगारवाढीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यावर काहीच घोषणा करण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ केल्याची घोषणा केली, मात्र थकीत बिलांचं काय?

यापूर्वी आम्ही जीएसटी माफ करू असं म्हटलं होतं. कारण खताला १८ टक्के जीएसटी आहे. म्हणजे जर शेतकऱ्याला वर्षाला एक लाख रूपयांचं खत लागत असेल तर त्यावर शेतकऱ्याला १८ हजार रूपये जीएसटी द्यावा लागतो. म्हणजे एकाबाजूने शेतकऱ्यांची लूट करायची आणि घोषणा करीत असल्याचा आव आणायचा. अर्थसंकल्प की जुमला संकल्प? वारकऱ्यांना पैसे देणं हा त्यांच्या अपमान आहे. वारकरी देहभान हरपूर विठूनामाचा गजर करतात. वारी ही हजारो वर्षांची परंपरा आहे. त्याला तुम्ही पैशांचा लोभ दाखवू शकत नाही. मौलाना आझाद महामंडळाचा निधी वाढवण्यात आलाय, म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे. मात्र आर्थिक तरतूद कुठून करणार, मोदी पैसे देणार आहेत का? 

हा शेवटचा अर्थसंकल्प आहे - एकनाथ खडसे

हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. निवडणूक समोर ठेऊन हा अर्थसंकल्प घोषित करण्यात आला आहे. 

लोकप्रिय घोषणा आहे, तरतूद मोठी केली आहे. मात्र पैसा आणणार कुठून? पैसा आणणार कुठून? आधीच कर्ज आहे. अशात नव्या योजनांसाठी कर्ज काढावं लागणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल याबाबत शंका आहे - एकनाथ खडसे

यशोमती ठाकूर आजच्या अर्थसंकल्पावर काय म्हणाल्या?

यशोमती ठाकूर आजच्या अर्थसंकल्पावर काय म्हणाल्या?

लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव दिसल्यानंतर शेतकऱ्यांसाठी या घोषणा करण्यात आल्या आहेत. 

 मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे आधीच इम्प्लिमेंट व्हायला हवं होतं. पण आता त्याला फार उशीर झाला आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, अर्थसंकल्पातील मोठी घोषणा

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला बळीराजाला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना' जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ हॉर्स पॉवर क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता १४ हजार ७६१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, अर्थसंकल्पातील मोठी घोषणा

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पेट्रोल-डिझेलचा दर हा 65 पैसे आणि डिझेलचा दर साधारण दोन रूपयांनी कमी होणार आहे. मूल्यवर्धित करात समानता आणण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील डिझेलवरील कर २४ वरून २१ टक्क्यांवर करण्याचे प्रस्तावित आहे. पेट्रोलवरील कर २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. 

 - अजित पवार 

मुलींसाठी मोफत शिक्षण

मोठी बातमी : 44 लाख कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ, पवारांची मोठी घोषणा

राज्यातील 44 लाख शेती कृषीपंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ - राज्यातील 44 लाख शेतकरी शेती कृषी पंपधारक साडे सात हॉर्स पॉवरच्या मोटर चालवतात. यांचा पूर्ण वीज माफीचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. 

अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या योजना

अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या योजना - 

- कापूस सोयाबीन नुकसान - प्रति हेक्टरी ५ हजार मदत केली जाणार 

- राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील

- ⁠नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील

- ⁠मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबवली जाईल

- ⁠वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील

- ⁠बचत गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार निधी देण्यात येईल

- ⁠यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे

- व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. दुग्ध उत्पादक यांना प्रति लिटर ५ रूपये अनुदान मदत सुरू ठेवली जाईल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा डायविंग केंद्र सुरू करण्यात येणार - अजित पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा डायविंग केंद्र सुरू करण्यात येणार, यासाठी 20 कोटींचा निधी देण्यात येणार असून यातून 1000 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.  - अजित पवार

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, पाहा अर्थसंकल्प Live

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

राज्यात १ लाख लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर आहेत. यात शंभरहून अधिक डॉक्टर कसे वाढतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा, 10 हजारांचं विद्यावेतन

अर्थसंकल्पात तरूणांसाठीच्या योजना..

 

विविध शैक्षणिक संस्थांतून ११ लाख विद्यार्थी पदवी-पदव्युत्तर उत्तीर्ण होत असतात. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना - शासनामार्फत दरमहा १० हजार विद्यावेतन देण्यात येईल. 

शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन योजना

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर उर्जा पंप योजना

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर उर्जा पंप योजना 

पशूंची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार - अजित पवार

- शासकीय नवी दुग्ध व्यवसाय प्रकल्प

- पशूंची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

- गाई दूध उत्पादकांसाठी प्रतिलिटर दूधाला पाच रूपये अनुदान 

ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार - अजित पवार

नैसर्गिक आपत्तीमुळे परिणाम झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून विविध सोयी पुरविण्यात आल्या आहेत. ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. याशिवाय ९२ लाख शेतकरी कुटुंबांना अनुदान देण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा 

महिलांचे आर्थिक स्वावलंबन, वय २१ ते ६० वर्षापर्यंत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रूपये प्रदान करण्यात येतील. यासाठी ४६ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून जुलै २०२४ पासून योजना राबवण्यात येणार आहे. 

महिलांसाठी विविध योजना - अजित पवार

मुलींना वयाच्या १८ व्या वयापर्यंत लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा, मातृ वंदना योजना, महिलांसाठी विशेष बस, शक्ती सदन योजना अशा विविध योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत - अजित पवार

बोला पुंडलिक वरदे म्हणत राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात...

बोला पुंडलिक वरदे, हार विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय म्हणज राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात...

राज्याचा दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करीत आहेत - अजित पवार

राज्याचा दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करीत आहेत - अजित पवार

पुढील काही वेळात राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरूवात..

पुढील काही वेळात राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरूवात..

ससून रूग्णालयात असं काय आहे, तावडे कोण आहे? - नाना पटोले

ड्रग्सबाबत रोहित पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. यामध्ये दारूपेक्षा ड्रग्ज विषय अधिक महत्त्वाचा. ससून रूग्णालयात असं काय आहे, तावडे कोण आहे? हे सर्वजण सरकारतच्या आशीर्वादाने बसलेलं आहे. दारूपेक्षा ड्रग्जचा वापर वाढला आहे. हा महाराष्ट्राला कलंक आहे. विद्येच्या माहेरघराला अशा घटना घडलं म्हणजे पुण्याला कलंक आहे. - नाना पटोले 

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दोन चुका झाल्या, फडणवीस म्हणाले...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दोन चुका झाल्या, फडणवीस म्हणाले...

आरोपीची तातडीने मेडिकल करायला हवी होती दुसरं म्हणजे गुन्हा नोंदविताना पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळवायला हवं होतं.

श्रीमंताचा व्यक्ती सहज सुटून जाऊ शकतो.. - रोहित पवार

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात बोलताना राहुल गांधींनी गृहमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केले. अशा गुन्ह्यातून  श्रीमंताचा व्यक्ती सहज सुटून जाऊ शकतो, उद्या चूक केली तर गरीब असो वा श्रीमंत, कोणावरही कारवाई झालीच पाहिजे यासाठी पारदर्शक प्रकिया काय असेल? - रोहित पवार

पुण्याला उडता पंजाब म्हणत त्याची बदनामी करणं योग्य नाही - फडणवीस

पुण्याला उडता पंजाब म्हणत त्याची बदनामी करणं योग्य नाही. आपल्या राज्यात आलेलं गुंतवणूक पुण्यात आली आहेत. - देवेंद्र फडणवीस

पुण्यातील पब्ज-बारमधून पाच लाखांचा हफ्ता घेतला जात आहे - विजय वडेट्टीवार

ससून ड्रग्स विकण्याचा अड्डा झाला आहे. पुण्यातील पब्स-बारमधून महिन्याला पाच लाखांचा हफ्ता घेतला जात आहे. कारवाई केलेल्या 70 पैकी 27 पब्जला परवाना नव्हता. - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

नीट प्रकरणात विरोधकांकडून गोंधळ, लोकसभेचं कामकाज 1 जुलैपर्यंत तहकूब

नीट प्रकरणात विरोधकांकडून गोंधळ, लोकसभेचं कामकाज 1 जुलैपर्यंत तहकूब 

अर्थसंकल्पाचा पेपर आधीच फुटला, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

अर्थसंकल्पाचा पेपर आधीच फुटला, नाना पटोलेंचा गंभीर आरोप 

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच आज विविध वृत्तमाध्यमांमध्ये अर्थसंकल्पाचे विविध मुद्दे प्रसिद्ध झाल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. विधानसभेत बोलताना त्यांनी अर्थसंकल्प लीक झाल्याचा आरोप केला आहे. 

राज्यात युरिया खताचा होतोय काळाबाजार, कृषी मंत्र्यांची कबुली

राज्यात युरिया खताचा होतोय काळाबाजार

युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची कबुली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली. 

लेखी उत्तरात कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी कबुली दिली आहे. अनुदानित युरियाचा काळाबाजार झाल्याची मुंडे यांनी लेखी उत्तरात माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिर या मुलगा प्रशंसकसह विधानभवनात दाखल

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिर या मुलगा प्रशंसकसह विधानभवनात दाखल

NEET पेपर लीक प्रकरणात गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित

NEET पेपर लीक प्रकरणात गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित

आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला नीटचा मुद्दा गाजला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सुरुवातीला सभागृहात नीटच्या मुद्द्यावरून चर्चा व्हावी. 

शेतकऱ्यांच्या मुद्द्यापासून अधिवेशनाला सुरुवात...

शेतकऱ्यांच्या मुद्द्यापासून अधिवेशनाला सुरुवात...

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत केली नसल्याचा विरोधकांचा आरोप..

एक अकेला मोदी सब पे भारी... विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झळकले बॅनर

आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय?

आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय? 

अजित पवार सादर करणाऱ्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. यातून महिलांना महायुतीकडे आकर्षित करण्याची रणनिती महायुतीची आहे. त्यानुसार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेची घोषणा होवू शकते. या योजने नुसार प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रूपये जमा केले जातील. या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील महिलां होणार आहे. राज्यातल्या 3 कोटी पेक्षा जास्त महिलांना याचा लाभ होणार आहे. मध्य प्रदेशात ही योजना गेम चेंजर ठरली होती. त्या धर्तीवरच आता युती सरकारने ही योजना लागू करण्याची रणनिती आखली आहे.त्याची घोषणा होण्याची चर्चा जोरात आहे  



विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक अधिवेशनात होण्याची शक्यता

विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक अधिवेशनात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गेले अनेक दिवस सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे अधिवेशनात सभापतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप सभापती पदावर करणार दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.