जाहिरात

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, दोघांनी काय केलं? पाहा VIDEO

Uddhav Thackeray Eknath Shinde Viral Video: अंबादास दानवे आणि मिलींद नार्वेकर यांची एन्ट्री झाली. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला, यावेळी दोघांमध्ये धावता संवादही झाला.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर,  दोघांनी काय केलं? पाहा VIDEO

मुंबई: महाराष्ट्र राज्याचा 2025-26 सालचा अर्थसंकल्प आज महाराष्ट्र  विधानसभेच सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या बजेटमध्ये शेतकरी, युवकांसाठी मोठ्या घोषणा केल्या. महायुती सरकारच्या या बजेटपेक्षा राज्याच्या विधानभवन परिसरात झालेल्या एका भेटीचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच समोरासमोर आले. या भेटीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणाला हादरा देणारी घटना घडली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेना पक्षात उभी फूट पडली. याच फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेमधून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या फुटीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर आले. 

अर्थसंकल्पाच्या निमित्ताने विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निघाले असतानाच समोरुन उद्धव ठाकरे, अंबादास दानवे आणि मिलींद नार्वेकर यांची एन्ट्री झाली. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला, यावेळी दोघांमध्ये धावता संवादही झाला.

( नक्की वाचा : Budget 2025: सागरी दळणवळणात महाराष्ट्र 'महाशक्ती' ठरणार; अर्थसंकल्पात अजित पवारांच्या मोठ्या घोषणा )

मात्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरेंच्या समोर येणे टाळले. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांना बगल देत निघून गेले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही. या भेटीवरुनच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुन्हा दिलजमाई होणे अशक्य आहे, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.