जाहिरात

Budget Session 2025: विधानसभेत उलटंच घडलं अन् मंत्री उदय सामंत संतापले; विरोधकांची जोरदार खरडपट्टी!

Maharashtra Assembly Budget Session Live: विधानसभेमध्ये लक्षवेधी प्रश्नांची मांडणी करताना विरोधी आमदार गैरहजर असल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर... 

Budget Session 2025: विधानसभेत उलटंच घडलं अन् मंत्री उदय सामंत संतापले; विरोधकांची जोरदार खरडपट्टी!

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याच्या या अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. मात्र आज विधानसभेमध्ये लक्षवेधी प्रश्नांची मांडणी करताना विरोधी आमदार गैरहजर असल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधिमंडळाचा वेळ अमुल्य असतो त्यामुळे विधीमंडळाच्या कामकाजात सर्व आमदार तसेच मंत्र्यांनी वेळेत हजर राहावे, असा नियम आहे. अनेकदा विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सत्ताधारी मंत्री विधीमंडळाच्या कामकाजात अनुपस्थित राहतात. मात्र आज विधानसभेत लक्षवेधी सुचनांवर मंत्रिमहोदय उत्तर देत असताना विरोधी आमदार गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. ज्यावरुनच उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. 

काय म्हणाले उदय सामंत?

"अध्यक्षमहोदय, आज सात लक्षवेधी आहेत, त्यापैकी फक्त एक सदस्य उपस्थित आहेत. काही सदस्यांनी पत्र दिले आहे की लक्षवेधी पुढे ढकला. ज्यावेळी मंत्री सभागृहात नसतात तेव्हा बोंबाबोब होते. त्यांच्या कामावर आक्षेप घेतला जातो. आज सभासद उपस्थित नाहीत. माझी मंत्री म्हणून विनंती आहे की जे सभासद उपस्थित नाहीत त्यांच्या लक्षवेधी रद्द कराव्या," असे म्हणत उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. 

Beed Crime : बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!

"असंच चालू राहिलं तर सकाळी सहा होतात, पंधरा होतात. अधिकाऱ्यांकडून वारंवार आढावा घ्यावा लागतो. सभासद साडेबारा वाजता संपतं त्यानंतर अधिकाऱ्यांचा देखील विचार करावा, अशी माझी विनंती आहे. त्यामुळे जे इथे येणार नाहीत त्यांच्या लक्षवेधी रद्द कराव्यात. पत्र दिलेल्यांना अगोदरच विचारायला हवं होतं का? येणार की नाही. म्हणजे आम्ही अभ्यास करायचा आहे आणि इथे आल्यावर सभासद नाहीत, त्यावर काय करायचं?" असा सवालही उदय सामंत यांनी विचार केला. 

नक्की वाचा - Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा