जाहिरात

Maharashtra Politics: अजित पवारांची भाजपविरोधात कुरघोडी, थेट अमित शाहंकडे तक्रार? पडद्यामागे काय घडतंय?

अजित पवार हे भाजपाविरोधात  मुद्दाम कुरघोडी करत आहेत असा सूर या नेत्यांनी लावला. 

Maharashtra Politics: अजित पवारांची भाजपविरोधात कुरघोडी,  थेट अमित शाहंकडे तक्रार? पडद्यामागे काय घडतंय?

मुंबई: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाहंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अशातच अमित शाह यांच्या या दौऱ्यामध्ये मोठी घडामोड घडली असून भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार हे भाजप आमदार तसेच पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना ताकद देण्याचे काम करत असल्याची नाराजी भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी अमित शाह यांच्या हस्ते नांदेडमध्ये ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी भाजपच्या आमदारांनी त्यांची भेट घेत अजित पवार यांच्याबाबत तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार हे भाजपाविरोधात  मुद्दाम कुरघोडी करत आहेत असा सूर या नेत्यांनी लावला. 

(नक्की वाचा: Mumbai Rain Red Alert: मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS)

2024 साली विधानसभा निवडणुकीत भाजपा आमदारांकडून पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचे काम मुद्दाम अजित पवार करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू पाहत आहेत. तसेच भाजपा विरोधकांना ताकद देत आहे याकडे लक्ष द्यावे अशा तक्रारीचा पाढाच भाजपा आमदार तसेच मंत्र्यांनी अमित शाहंसमोर मांडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  

दरम्यान,  अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला असून ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत. त्याआधी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी रात्री मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com