जाहिरात

Maharashtra Politics: प्रकाशनाआधीच संजय राऊतांच्या पुस्तकावर बंदी? चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

पुस्तकावरुन राजकारण रंगले असतानाच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुस्तकावर बंदी आणण्याबाबत मोठे अन् महत्त्वाचे विधान केले आहे.

Maharashtra Politics: प्रकाशनाआधीच संजय राऊतांच्या पुस्तकावर बंदी? चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

प्रविण मुधोळकर, नागपूर: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीची स्थापना, आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या ईडीच्या कारवायांपर्यंत या पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. एकीकडे या पुस्तकावरुन राजकारण रंगले असतानाच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुस्तकावर बंदी आणण्याबाबत मोठे अन् महत्त्वाचे विधान केले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत चंद्रशेखर बावनकुळे?

त्या पुस्तकाचे नाव बद्दलण्याची गरज असून नरकातला राऊत अस पुस्तकाचं नाव ठेवावे. संजय राऊत यांना यासाठी पत्रही पाठवणार आहे. या पुस्तकामध्ये स्वतःचे राजकीय अधिपतन कसे असते याचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांच्या नैतिक दिवाळखोरीची ही कहाणी आहे. काँग्रेस महाविकास आघाडी फुटत आहे, म्हणून आत्ता हे पुस्तक आणले असाही आरोप बावनकुळे यांनी केला.

 "गुजरात दंगलीत मोदी शाह  यांना निर्दोष सोडले आहे. या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांच नाव घेऊन बदनाम करत आहे. पुस्तकाची चौकशी झाली पाहिजे, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असताना काही प्रकरणांचा उल्लेख केला आहे. कोर्टाचा अपमान होईल असं वक्तव्य पुस्तकात आहे, न्यायालयाबद्दल टिप्पणी आली असेल तर चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी यावेळी बावनकुळे यांनी केली.

( नक्की वाचा : भारतासोबत फक्त 18 मे पर्यंत शस्त्रसंधी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य! )

तसेच देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचे काम पुस्तकातून केले आहे. पुस्तकाला बॅन लावायचा अधिकार आम्हाला नाही. न्याय व्यवस्थेचा विषय आलं असेल तर ज्यांनी कोणी लिहल असेल याची योग्य कारवाई झाली पाहिजे.वाचून पुस्तकावर कारवाईची मागणी करणार आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणालेत. 

(नक्की वाचा- India Alliance इंडिया आघाडी शाबूत आहे की नाही माहिती नाही! काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या विधानामुळे खळबळ)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com