जाहिरात

Weather Update: काळजी घ्या! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Maharashtra IMD Alert Rain News: राज्याच्या दक्षिण  कोकण किनार पट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता  हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे. 

Weather Update: काळजी घ्या! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस कोसळत आहे. पावसाचा हा जोर 24 मे पासून 28 मेपर्यंत राहणार आहे. राज्याच्या दक्षिण  कोकण किनार पट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता  हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे. 

(नक्की वाचा: विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा)

राज्याच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पुढील चार दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर बुलढाणा, यवतमाळ, लातूर, नांदेडमध्येही जोरदार पावसाची शक्यता अशल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचेचे झाड कोसळून एका गरीब कुटुंबाचे घर उद्ध्वस्त झाले आहे. निंबापूर गावात राहणाऱ्या कातकरी या आदिम जमातीच्या मोहन भोये यांच्या घरावर चिंचेचं झाड कोसळलं असून यात मोहन भोये आणि त्यांची पत्नी सुनीता भोये हे दोघे जखमी झाले आहेत. भोये कुटुंब वर्षातले सहा महिने रोजगारासाठी स्थलांतर करून विटभट्टीवर मजुरी करतात. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी भोये कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com