सागर कुलकर्णी, मुंबई: राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आज नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी आज सकाळपासूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यभरातील नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. खाते वाटप अन् इच्छुंकांच्या गर्दीमुळे रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. आज सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी आज सकाळपासूनच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदासाठी नाव फायनल झालेल्या नेत्यांना फोन करायला सुरुवात झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, प्रकाश आबीटकर, आशिष जैस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले या नेत्यांना आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी फोन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भाजकडून गिरीश महाजन, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे. चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, पंकज भोयार, यांना संपर्क करण्यात आला आहे.
दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवळ, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, यांच्यासह हसन मुश्रीफ, दत्ता भरणे यांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातमी - अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीला हार्ट अटॅक! शाळेत खेळता खेळता मृत्यू; कुठे घडली घटना?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world