जाहिरात

आरक्षणासाठी आणखी एका मराठा बांधवाने संपवलं आयुष्य, धाराशिवमधील घटनेने खळबळ

Dharashiv News : आत्महत्या करण्यापूर्वी निलंगे यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

आरक्षणासाठी आणखी एका मराठा बांधवाने संपवलं आयुष्य, धाराशिवमधील घटनेने खळबळ

संगीता काळे, धाराशिव

मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यात आणखी एका मराठा बांधवाने आपलं आयुष्य संपवलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील पाटोदा गावातील शिवाजी उर्फ अमोल विठ्ठल निलंगे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी निलंगे यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माझ्यावर ट्रॅक्टर व शेतीचे कर्ज जास्त झाले आहे. त्यात यावर्षी नापिकी आहे. तसेच माझ्या मुलाचा नंबर सैनिकी स्कूल यादीत सर्वात शेवटी लागला. जास्त गुण असून देखील हा अन्याय  मराठा समाजावर का? असा सवाल अमोल निलंगे यांनी विचारला आहे. 

(नक्की वाचा-  दगडूशेठ गणपतीच्या काही अंतरावर भगदाड, ट्रकसह 2 दुचाकीही कोसळल्या, धक्कादायक CCTV Video )

पहिल्या यादीत इतर मागासवर्गीय यांचा नंबर लागला. कारण आमच्या समाजाला मराठा आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मी आत्महत्या करत आहे, असं अमोल निलंगे यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य )

आत्महत्येची घटना झाल्यानंतर गावकऱ्यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात जात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: