जाहिरात

Cyber Fraud: एक चूक अन् आयुष्यभराची कमाई गेली! ATS अधिकारी बनून वृद्धाला लुटलं, 1.54 कोटी गमावले

आरोपींनी स्वतःला ATS अधिकारी असल्याचे भासवून अटक व पोलीस कारवाईची धमकी देत, संपत्ती व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ही रक्कम उकळल्याचे समोर आले आहे.

Cyber Fraud: एक चूक अन् आयुष्यभराची कमाई गेली! ATS अधिकारी बनून वृद्धाला लुटलं, 1.54 कोटी गमावले

Navi Mumbai Cyber Fraud:  सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे 62 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल 1,54,98,000/- ची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी स्वतःला ATS अधिकारी असल्याचे भासवून अटक व पोलीस कारवाईची धमकी देत, संपत्ती व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ही रक्कम उकळल्याचे समोर आले आहे.

नवी मुंबईत सायबर फ्रॉड

या प्रकरणी गुन्हा क्रमांक 18/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 319(2), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 351(4), 204, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच IPC अंतर्गतही संबंधित कलमे लागू करण्यात आली आहेत.

Pune Crime: आणखी एक 'कॅप्टन खरात' सापडला! दोष दूर करण्यासाठी संबंध, खेडमधील आश्रमात भयंकर खेळ

तक्रारदार विनायक गोविंद देशमुख (वय 62), रा. कळंबोली, पनवेल हे सेवानिवृत्त असून त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 23 मार्च ते 31 मार्च 2026 दरम्यान आरोपींनी मोबाईल क्रमांक +855 85528** +91 9606195*, +91 8757270** वरून संपर्क साधला. व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल व ‘Signal' अॅपचा वापर करुन स्वतःला एटीएस अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच आरबीआयचे बनावट पत्रही पाठवले. 

अटक व कारवाईची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी मदत  व “संपत्ती पडताळणी च्या नावाखाली पैसे मागितले अशा प्रकारे आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने रक्कम मागवून ₹1.54 कोटींहून अधिक रक्कम उकळली. तक्रारदार 1 एप्रिल 2026 रोजी सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कानगुडे
पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे दोघे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Solapur Crime: हृदयद्रावक! पित्याने 3 मुलींना विष पाजलं, स्वतःही आयुष्य संपवलं, भयंकर घटनेने सोलापुरात खळबळ

दरम्यान,  स्वतःला सरकारी अधिकारी सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये RBI/ATS/CBI नावाने येणाऱ्या कॉल्स किंवा मेसेजची खातरजमा करावी कोणत्याही दबावाखाली ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू नयेत अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com