जाहिरात

Gulabrao Deokar: 10 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री दोषी, राजकीय वर्तुळात खळबळ

Gulabrao Deokar Scam: जळगावमध्ये 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी आढळलेत.

Gulabrao Deokar: 10 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री दोषी,  राजकीय वर्तुळात खळबळ

मंगेश जोशी, जळगाव:

Gulabrao Deokar Loan Case: राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी असल्याचे आढळून आले आहेत. जिल्हा बँकेचे चेअरमन असताना पदाचा गैरवापर करत त्यांच्याच श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेला दहा कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी चौकशी समितीने दोषी ठरवलं आहे. गुलाबराव देवकर यांनी नुकताच शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर चौकशी अहवालात दोषी आढळल्याने देवकर यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित होत आहे. 

Rohit Pawar News: रोहित पवारांना मोठा धक्का! EDकडून पुरवणी आरोपपत्र दाखल; प्रकरण काय?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी आढळले असून जिल्हा बँकेत चेअरमन पदावर असताना पदाचा गैरवापर करत त्यांच्यात श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेला 10 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी चौकशी समितीने गुलाबराव देवकर यांना दोषी ठरवले आहे.

धुळे जिल्ह्याच्या सहकारी संस्था उपनिबंधक मनोज चौधरी यांनी विभागीय सहनिबंधकांना हा चौकशी अहवाल सादर केला असून या अहवालात बँकिंग रेगुलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 20 चे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव देवकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झाले होते.

Maharashtra Politics: अधिवेशनाच्या रणधुमाळीत शिंदे गटाला ग्रहण! 4 बडे शिलेदार टार्गेटवर; विरोधकांकडून कोंडी

या निवडणुकीनंतर गुलाबराव देवकरांनी नुकताच शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता व या प्रवेशाला गुलाबराव देवकरांचा तीव्र विरोध होता. एकीकडे महायुतीत जिल्ह्यातीलच नेत्यांकडून विरोध व दुसरीकडे चौकशी अहवालात दोषी आढळल्याने गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com