जाहिरात

"राम सातपुतेंच्या डोक्यावर परिणाम झालाय", उत्तर जानकरांचं रोखठोक उत्तर

राम सातपुते यांना 2029 ला गुलाल आपलाच असेल, असा दावा केला. यावर बोलताना उत्तम जानकर यांनी म्हटलं की, 2029 पर्यंत कशासाठी वाट पाहतो. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. मी त्याला उद्याच आमदार करतो.

"राम सातपुतेंच्या डोक्यावर परिणाम झालाय", उत्तर जानकरांचं रोखठोक उत्तर

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

सोलापुरातील मारकडवाडी गाव अचानक चर्चेत आलं आहे. बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करत मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमवर एकप्रकारे संशय उपस्थित केला. मात्र भाजपचे माजी आमदार राम सातपुते, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सभा घेत ही ग्रामस्थांची मागणी नाही, असा दावा केला. राम सातपुते यांनी यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांसह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला आमदार उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभेत पराभव झाल्यामुळे राम सातपुते यांच्या डोक्यावर परिणाम झाला. मेंटली ते डिस्टर्ब झाले आहेत. श्री श्री आश्रम बेंगलोर येथे उपचार घेत होते. पुन्हा विधानसभेत पराभव झाल्यामुळे परिणाम झाला. पुढे जाऊन त्यांना दंगली घडवायच्या आहेत. असं मेंटल होऊन कसं चालेल. त्यांचं आताच लग्न झालंय.  राम सातपुते यांना विधानपरिषदेवर जायचं आहे. त्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असा चिमटाही उत्तम जानकर यांनी घेतला. 

(नक्की वाचा- '.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट)

राम सातपुते यांना 2029 ला गुलाल आपलाच असेल, असा दावा केला. यावर बोलताना उत्तम जानकर यांनी म्हटलं की, 2029 पर्यंत कशासाठी वाट पाहतो. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. मी त्याला उद्याच आमदार करतो. माझे मत कुठे गेले हे निवडणूक आयोगाला विचारायचंय. हेराफेरी ईव्हीएमच्या माध्यमातून केली जात आहे. 

मोहिते-पाटलांना जेलमध्ये टाकणार

मोहिते पाटील यांनी जिल्हा बँक खाल्ली, पतसंस्था खाल्ली. अशा मोहिते पाटील यांना मातीत आणू. मोहिते पाटलांना जेलमध्ये टाकणार, अशी टीका राम सातपुते यांनी केली. याला उत्तर देताना उत्तम जानकर यांनी म्हटलं की, मोहिते पाटलांनी खूप लोकांना हाताळलं आहे. उंदरानं गडबड करून मोहिते पाटील संपणार नाही.

(नक्की वाचा-  "खळं लुटणारा मारकडवाडी गावात आला", सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर नाव न घेता टीका)

उत्तम जानकर यांनी यावेळी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दलही गोपीचंद पडळकर यांनाही चोख उत्तर दिलं. कावळ्याचा शापानं गुरे मरत नाहीत.उंदरांचा सुळसुळाट झाला म्हणून पवार साहेबांना काही फरक नाही. मागील 10 वर्षात मारकडवाडी गावात का गेले नाहीत कारण अनेक भुंकणारे लोकं असतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com