जाहिरात

Parbhani News : LPG गॅसच्या फ्रेंचायजीच्या नावाने फसवणूक, व्यापाऱ्याला 28 लाख रुपयांचा गंडा

परभणी शहराबाहेर गंगाखेड रोडवर एलपीजी गॅस पंपाची फ्रेंचाइजी घेण्यासाठी 80 लाख रूपये लागतील असे फसवणूक करणाऱ्या तिघांनी सांगितले. त्यात 80 लाख रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम प्रथम भरावी लागेल व उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात लोन करून मिळवुण देतोत असे सांगितले.

Parbhani News : LPG गॅसच्या फ्रेंचायजीच्या नावाने फसवणूक, व्यापाऱ्याला 28 लाख रुपयांचा गंडा

Parbhani News : गंगाखेड शहरातील कापड व्यवसायिक असलेले गंगाधर कुरूडे याना एलपीजी गॅस पंपाची फ्रेंचाइजी देण्याचे प्रलोभन दाखवुन 28 लाख रूपयाची अर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरूडे यांनी 17 जुन रोजी  नागपुर येथील 'फॉर्च्युन पेट्रोलियम आणि ऑटो प्रा.लि.' नागपूर येथील या कंपनीचे अधिकारी म्हणून असलेले राजेश नायर (मॅनेजिंग डायरेक्टर), राहुल शिंदे , सचिन दुधे याच्यावर 28 लाख रूपयाची अर्थिक फसवणूक केल्याचं फिर्यादीत सांगितलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
                          
एका वृत्तपत्रात सन 2020 मध्ये फोरच्युन पेट्रोलियम आणि ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यानी गंगाखेड रोडवर एलपीजी गॅस पंपाची फ्रेंचाइजी देण्याची जाहिरात प्रकाशित झाली होती. फोनद्धारे गंगाधर करूडे यानी नागपुर येथे फ्रेंचाइजीसाठी संपर्क केला होता. यावेळी त्यांना गंगाधर कुरूडे याना नागपुर येथे बोलावून घेतले. नागपूरला गेल्यानंतर त्याची भेट राजेश नायर, राहुल शिंदे, सचिन दुधे याच्याशी दिलेल्या जाहिरातीवरून फ्रेंचाइजीसाठी बोलणे झाले.

परभणी शहराबाहेर गंगाखेड रोडवर एलपीजी गॅस पंपाची फ्रेंचाइजी घेण्यासाठी 80 लाख रूपये लागतील असे फसवणूक करणाऱ्या तिघांनी सांगितले. त्यात 80 लाख रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम प्रथम भरावी लागेल व उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात लोन करून मिळवुण देतोत असे सांगितले. फ्रेंचाइजीचा व्यवहार ठरला. व्यवहाराप्रमाणे गंगाधर कुरूडे यांनी राजेश नायर, सचिन दुधे, राहुल शिंदे यानी वेळोवेळी सांगितल्यानुसार 28 लाख रूपये दिले. 

( नक्की वाचा : Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं? )

पैसे मिळाल्यानंतर नागपूर येथील राजेश नायर, सचिन दुधे, राहुल शिंदे यांच्याकडे एलपीजी गॅसपंपाची फ्रेंचाइजीसाठी संपर्क करत राहिले. त्यांना वारंवार वेगवेगळी कारणे देऊन टाळण्यात आले. कुरूडे यांनी फ्रेंचाइजीसाठी दबाव टाकला. त्यावेळी त्यांनी लोन मंजूर होत नाही, तुमचे पैसे परत घेऊन जा म्हणून दोन धनादेश कुरूडे यांना दिले. उर्वरित रक्कम 18 लाख रूपये डिसेंबर 2024 मध्ये नगदी स्वरूपात देण्यात येतील असे सांगितले. 

(नक्की वाचा- Raigad News: देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट पर्यटकांसाठी बंद; पोलीस प्रशासनाचे आदेश)

फसवणूक करणाऱ्या टोळीने धनादेश बॅकेत बाऊन्स झाल्यावर दुसरा धनादेश बॅकेत टाकू नये, सर्व रक्कम नगदी देण्यात येइल असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांचा संपर्क मोबाईल नंबर बंद झाला, या घटनेनंतर गंगाधर कुरूडे यांना आपली 28 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे कळाले. त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून राजेश नायर, सचिन दुधे, राहुल शिंदे याच्यावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com