जाहिरात

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चे उद्घाटन आणि बरंच काही; पंतप्रधानांचा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवायही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण ते करणार आहेत. 8 आणि 9 ऑक्टोबर अशा दोन्ही दिवशी पंतप्रधानांचे महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत.

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चे उद्घाटन आणि बरंच काही; पंतप्रधानांचा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 आणि 9 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन करून देशाला समर्पित करणार आहेत. यावेळी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो लाईन-3 च्या उद्घाटनासह ब्रिटनचे पंतप्रधान सर किअर स्टारमर यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील.

नक्की वाचा:  Navi Mumbai International Airport Inauguration: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या 7 गोष्टी माहितीये का?

कसा असेल पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा?

8 ऑक्टोबर (नवी मुंबई आणि मुंबई)

  1. दुपारी 3 वाजता: पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी.
  2. दुपारी 3:30 वाजता: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन , तसेच मुंबईतील अनेक प्रकल्पांची पायाभरणी 

9 ऑक्टोबर (मुंबई)

  1. सकाळी 10 वाजता: पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान सर किअर स्टारमर यांचे स्वागत.
  2. दुपारी 1:40 वाजता: दोन्ही देशांचे पंतप्रधानांचा जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे सीईओ फोरममध्ये सहभाग.
  3. दुपारी 2:45 वाजता: दोन्ही पंतप्रधानांचा 6 व्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये सहभाग आणि भाषण.

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो लाइन 3 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) चे उद्घाटन
सुमारे 19,650 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. हे विमानतळ भारतातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ आहे, जे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) गर्दी कमी करून, मुंबईला जागतिक स्तरावरील 'मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम'मध्ये आणण्यासाठी हे विमानतळ मदत करेल. 1,160 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या विमानतळाची क्षमता दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी (MPPA) आणि 3.25 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्याची असेल. या विमानतळावर टर्मिनल जोडण्यासाठी स्वयंचलित प्रवासी मूव्हर (APM) यंत्रणा असेल.हे विमानतळ 47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करेल, यात इलेक्ट्रिक वाहन (EV) बस सेवा आणि वॉटर टॅक्सीने जोडले जाणारे देशातील पहिले विमानतळ असेल.

नक्की वाचा: PM मोदींच्या दौऱ्यानिमित्त मोठे बदल! नवी मुंबईत 'या' वाहनांना नो एन्ट्री; जाणून घ्या वेळ आणि मार्ग

2. मुंबई मेट्रो लाईन-3 (ॲक्वा लाईन) आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या टप्प्याचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड पर्यंतच्या मुंबई मेट्रो लाईन-3 (टप्पा 2बी) चे उद्घाटन करतील. या टप्प्याला सुमारे 12,200 कोटी रुपये खर्च आला आहे. आरे ते कफ परेड या पूर्ण टप्प्यासाठी  37,270 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे.  ही मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो आहे. कफ परेड ते आरे जेव्हीएलआर (Cuffe Parade to Aarey JVLR) पर्यंत जाणारी ही 33.5 किमी लांबीची लाईन दररोज 13 लाख प्रवाशांना जलद वाहतूक सुविधा पुरवेल. यामुळे दक्षिण मुंबईतील मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), बॉम्बे हायकोर्ट, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नरिमन पॉइंटसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

3. 'मुंबई वन' – एकात्मिक सार्वजनिक वाहतूक ॲप

पंतप्रधान 11 सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने (मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस) प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या 'मुंबई वन' नावाचे (Integrated Common Mobility App) ॲप लाँच करतील. मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7, मुंबई मेट्रो लाईन 3, मुंबई मेट्रो लाईन 1, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरीय रेल्वे, बेस्ट (BEST), ठाणे महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेसाठी वेगवेगळी तिकीटे यापुढे काढावी लागणार नाही, कारण या ॲपमुळे सगळ्या सेवांसाठी वापरता येईल असे तिकीट मिळू शकेल. 

नक्की वाचा: नवी मुंबई विमानतळ कसे गाठाल? जवळचे रेल्वे स्टेशन कोणते? एका क्लिकवर मिळेल सगळी माहिती

 4. अल्प मुदत रोजगार कार्यक्रम (STEP)

महाराष्ट्रातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाने सुरू केलेल्या शॉर्ट-टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (STEP) चे उद्घाटन पंतप्रधान करतील. हा कार्यक्रम 400 सरकारी ITI आणि 150 सरकारी टेक्निकल हायस्कूलमध्ये सुरू होईल. या अंतर्गत 2,500 नवीन प्रशिक्षण बॅचेस सुरू होतील, ज्यात महिलांसाठी 364 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), इलेक्ट्रिक वाहने (EV) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या 408 बॅचेसचा समावेश आहे.

5. यूकेच्या पंतप्रधानांचा दौरा
पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून ब्रिटनचे पंतप्रधान सर किअर स्टारमर 8-9 ऑक्टोबर 2025 रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. हा त्यांचा पहिला अधिकृत भारत दौरा असेल. दोन्ही पंतप्रधान 'व्हिजन 2035' रोडमॅपनुसार, भारत-यूके व्यापक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील. यात व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, आरोग्य, शिक्षणासंबंधित धोरणांवर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय दोन्ही पंतप्रधान भारत-यूके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) द्वारे उपलब्ध असलेल्या संधींसंदर्भात उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी संवाद साधतील.

6. ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (Global Fintech Festival) 

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टारमर 6 व्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात या दोघांची भाषणेही होणार आहेत.  

GFF 2025 ची थीम: 'एका चांगल्या जगासाठी वित्त सक्षमीकरण' (Empowering Finance for a Better World) अशी असणार आहे.  यावर्षी 75 पेक्षा जास्त देशांतील 1,00,000 (एक लाखाहून अधिक) लोक ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यात 7,500 कंपन्या, 800 वक्ते आणि 70 नियामक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com