मेहबुब जमादार, रायगड
रायगडमध्ये माणगाव-पुणे मार्गावर ताम्हीणी घाटात खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी पैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ताम्हीणी घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटून हा अपघात झाला. पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे ही बस निघाली होती. लग्न समारंभासाठी वऱ्हाड बस मधून प्रवास करत होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. बसमध्ये 40 च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक यंत्रणेकडून मदत कार्य सुरू आहे.
(नक्की वाचा- मित्राला हळद लावून घरी निघाले, वाटेत भयंकर घडलं, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू)
रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात बस उलटून अपघात झाला आहे. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर गाडी उलटली. या अपघातात 2 पुरुष व 3 महिला अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 जखमींना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Jaipur Fire : केमिकलने भरलेल्या ट्रकला भीषण आग, अनेक वाहने जळून खाक; 5 जणांचा मृत्यू)
अपघातातील मृतांची नावे
- संगिता धनंजय जाधव
- गौरव अशोक दराडे
- शिल्पा प्रदिप पवार
- वंदना जाधव
- एकाची ओळख पटली नाही
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world