जाहिरात

वायूगळतीमुळे 60 विद्यार्थी रुग्णालयात, अनेकांवर ICUमध्ये उपचार सुरु; रत्नागिरीत काय घडलं?

या वायुगळतीमुळे जवळच असलेल्या माध्यमिक विद्यामंदर जयगड आणि कला वाणिज्य महाविद्यालय जयगड इथल्या विद्यार्थांना त्रास जाणवू लागला. सध्या विद्यालयातील 60 जणांवर उपचार सुरु आहेत.

वायूगळतीमुळे 60 विद्यार्थी रुग्णालयात, अनेकांवर ICUमध्ये उपचार सुरु; रत्नागिरीत काय घडलं?

राकेश गुडेकर, रत्नागिरी: रत्नागिरीमध्ये जिंदल पोर्ट कंपनीत वायूगळती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  पोर्टच्या प्रिव्हेटिव्ह मेंटेनन्सचं काम चालू असताना इथिल वायूची गळती झाली. या वायुगळतीमुळे जवळच असलेल्या माध्यमिक विद्यामंदर जयगड आणि कला वाणिज्य महाविद्यालय जयगड इथल्या विद्यार्थांना त्रास जाणवू लागला. सध्या विद्यालयातील 60 जणांवर उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  गुरुवारी (ता. 12) रत्नागिरीमध्ये असलेल्या जिंदाल पोर्टच्या प्रिव्हेटिव्ह मेंटेनन्सचं काम चालू असताना इथिल मरकॅप्टन वायूची गळती झाली. या गळतीमुळे कंपनीपासून एक दीड किलोमिटर असलेल्या माध्यमिक विद्यामंदर जयगड आणि कला वाणिज्य महाविद्यालय जयगड इथल्या विद्यार्थांना त्रास जाणवू लागला.विद्यालयातील एकुण 53 मुली, 1 महिला आणि 6 मुलं अशा 60 मुलांना त्रास झाला.

नक्की वाचा: 'सचिनने माझ्यासाठी काय केलं?', त्या भेटीनंतर विनोद कांबळी पहिल्यांदाच बोलला

या सर्वांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.  एकूण 62 विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. . त्यापैकी 4 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेच नजिकच्या गावामध्ये सुद्धा या वायूचा त्रास जाणवतोय का यासाठी पथके पाठवली आहेत. 

दरम्यान, सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. पोर्टच्या प्रिव्हेटिव्ह मेंटेनन्सचं काम चालू असताना इथिल मरकॅप्टन वायूची गळती झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - अतुल सुभाषवर जज हसत होते, काकांनी सांगितला तो किस्सा, मृत्यूनंतर पत्नीची आई-भाऊ फरार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: