जाहिरात

Ratnagiri News: चिपळुणात पहिल्यांदाच आढळला आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’, भारतातील पहिलीच नोंद

Black Heron – Egretta ardesiaca हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा निवासी पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, मोजांबिक आणि मॅडगास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत.

Ratnagiri News: चिपळुणात पहिल्यांदाच आढळला आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’, भारतातील पहिलीच नोंद

राकेश गुडेकर, रत्नागिरी

Ratnagiri News : निसर्गरम्य चिपळूणमध्ये पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या कॅमेऱ्याने एक ऐतिहासिक क्षण टिपला गेला आहे. भारतात आजवर कधीही न आढळलेला ‘ब्लॅक हेरॉन' (Black Heron) म्हणजेच काळ्या रंगाचा बगळा हा दुर्मिळ आफ्रिकन पक्षी पहिल्यांदाच या ठिकाणी दिसला आहे.

चिपळूणच्या पाणथळ भागात आढळलेले हे दोन पक्षी, केवळ चिपळूणसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय पक्षी निरीक्षकांच्या समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण नोंद ठरली आहे. डॉ. जोशी यांनी घेतलेल्या छायाचित्रांवरून सुरुवातीला काही पक्षी अभ्यासकांनी हा ‘ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन' असावा, असा अंदाज व्यक्त केला होता.

(नक्की वाचा- कबुतरखान्यावरुन दादरमध्ये राडा! जैन समाज आक्रमक, ताडपत्री हटवली, तोडफोड केली)

मात्र, लांबट पाय, पूर्ण काळे शरीर आणि त्यांची खास मासेमारीची शैली पाहून सर्व तज्ज्ञांनी एकमताने हा ‘ब्लॅक हेरॉन'च असल्याची पुष्टी केली. या दुर्मिळ पक्ष्याची भारतातील अधिकृत नोंद व्हावी यासाठी डॉ. जोशी यांनी हे फोटो आणि माहिती इंडियन बर्ड जर्नलकडे पाठवली आहे.

Black Heron – Egretta ardesiaca हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा निवासी पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, मोजांबिक आणि मॅडगास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत. युरोपातही काही अपवादात्मक नोंदी (ग्रीस, इटली, डब्लिन) आहेत.

(नक्की वाचा-  Mumbai News: लायसन्स कपड्याचे आणि विकत होते दारू, टेलरिंगच्या दुकानात उघडले रेस्टॉरंट)

मात्र भारतात आजवर या पक्ष्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नव्हता. हा पक्षी स्थलांतर करत नाही. केवळ अन्नपाण्याची कमतरता असल्यास तो परिसर बदलतो. त्यामुळे त्याच्या चिपळूणमध्ये अचानक झालेल्या आगमनाने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com