जाहिरात

कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हगून भरला दरबार! संजय राऊतांची टीका

शिवाजी पार्कातीलस दसरा मेळावा हा देवाची आळंदी असून आझाद मैदानातील दसरा मेळावा हा चोराची आळंदी असल्याची टीका राऊत यांनी केली.  

कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हगून भरला दरबार! संजय राऊतांची टीका
मुंबई:

मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा  ( Shivsena Dusshera Melava) पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका केली. त्यांच्या टीकेचा विशेष रोख हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच होता. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी असे पुन्हा पुन्हा आवाहन केले. शिवाजी पार्कातीलस दसरा मेळावा हा देवाची आळंदी असून आझाद मैदानातील दसरा मेळावा हा चोराची आळंदी असल्याची टीका राऊत यांनी केली.  

नक्की वाचा : सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट

आदित्य तुम्ही लहान मूल राहिला नाहीत

संजय राऊत यांनी म्हटले की,  "शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात आपण पहिले भाषण केलेत, शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही नवी सुरुवात आहे असे मी मानतो. आदित्य तुम्ही लहान मूल राहिले नाही. तुम्ही आता राज्याचे, देशाचे नेते झाला आहात. आपण मगाशी विचारलं की लढणार का ?जेव्हा जेव्हा ठाकरेंच्या तीन पिढ्यांनी आवाहन केलं की लढाल का ? तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र लढायला ठाकरेंच्याच मागे उभा राहिला आहे. हा महाराष्ट्र आपल्याही नेतृत्वाखाली लढायला तयार आहे. "

नक्की वाचा : वाळेकरांचे ठरलं, किणीकरांचे टेन्शन वाढलं; अंबरनाथमध्ये शिंदेंची शिवसेना भाकरी फिरवणार

मशाल नावाचे शस्त्र आमच्या हाती

राऊत यांनी पुढे म्हटले की, "मशालीसारखं चिन्ह या जगात दुसरं कोणतं नाही असे मी मानतो. मशाल ही अंधाराची शत्रू आहे.  उद्धव ठाकरेंना मी सांगू इच्छितो की आपण येण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे भाषण झाले. त्यांच्या भाषणाने महाराष्ट्रातील राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. शस्त्रपूजा झाली. अनेक शस्त्र तिथे आपण ठेवली आहे. या देशात अनेक शस्त्रे आहेत, सकाळी नागपूरला शस्त्रपूजा झाली. आमच्या शस्त्रामध्ये एक नवे शस्त्र आले आहे, मशाल. यापुढे मशालीलाही शस्त्राचा दर्जा द्यावा लागेल असे शस्त्र आमच्या हाती आले आहे. एक चिंगारी काफी है  मशाल जलाने के लिए और एक मशाल काफी है ज्वालामुखी उठाने के लिए. मशाली पेटल्या आहेत. हा निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे, स्वाभिमान्यांचा महाराष्ट्र आहे."

नक्की वाचा : 'खुन्नास देताय, अपमान करताय, आता उखडून फेकणार, सुट्टी नाही' जरांगेच्या भाषणातले 5 ठळक मुद्दे

नाव आझाद मैदान आणि मंचावर सगळे गुलाम- राऊत

रतन टाटांचे निधन झाले, उद्योगपती गेल्यावर देश हळहळत नाही. उद्योगपती मध्यमवर्गीयांना आपला वाटत नाही. रतन टाटा गेल्यानंतर देश हळहळला, रडला. याचं कारण म्हणजे गेली अनेक शतके टाटा म्हणजे विश्वास. विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे ठाकरे. ही देवाची आळंदी आहे, चोराची आळंदी आझाद मैदानात भरली आहे. नाव आझाद मैदान आणि मंचावर सगळे मोदींचे गुलाम बसलेत. गुलामांचा मेळावा आझाद मैदानावर भरलाय, असे राऊत यांनी आपल्या भाषणात म्हटले. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हा!

संजय राऊत यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "लोकसभा निवडणुकीत आपण सगळ्यांनी मोदी-शाहांचा दारूण पराभव केला. यामुळे हा नुसता दसरा मेळावा नसून हा विजय मेळावा आहे. दोन महिन्यांनी इथे आपल्याला विजय मेळावा घ्यायचाय. त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर असेल. उद्धव ठाकरे तुम्हाला  या राज्याचे नेतृत्व करावे लागेल.  निकाल लागले हरियाणात आणि पेढे वाटले फडणवीसांनी. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात विजय प्राप्त करू असे म्हणतायत. छाती फुगवून इथे चालतायत. निवडणुका होऊ द्या तुमच्या छातीतील हवा टाचणी मारून कमी करू."

हरियाणात ईव्हीएम घोटाळा

हरियाणातील निकाल हा ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले की, "हरियाणाचा निकाल इटरेस्टींग आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर होता 12 वाजता भाजपने सरकार बनवलं. हा चमत्कार कसा झाला ?  0.6 टक्के मतांनी कोणताही पक्ष 30 जागा जिंकू शकत नाही. हा ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय, लांड्या लबाड्या असल्याशिवाय हरियाणात काँग्रेसचा पराभव होऊ शकत नाही. हरियाणात घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. महाराष्ट्राची लूट थांबवायची असतील तर या राज्याची सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती द्यावी लागतील.  कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हगून भरला दरबार; अशी घाण महाराष्ट्रात केली आहे. "

"देशाची न्यायव्यवस्था विकली गेल्याने भ्रष्टाचार होत आहे. सरन्यायाधीश पंतप्रधानांसोबत आरती करतात, पंतप्रधानांना मोदक देतात, आम्हाला न्याय कसा मिळेल. आमदार अपात्रतेचा प्रश्न शिल्लक आहे. सरन्यायाधीश आपण महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसवले ते पाहाता तुम्हाला झोप कशी लागते हा प्रश्न आम्हाला पडला आहे. देशात, राज्यात भ्रष्टाचार झालाय त्याला देशाची विकत गेलेली न्यायव्यवस्था जबाबदार आहे. " अशी टीका राऊत यांनी केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com