
Ramdas Kadam Dussehra Melava Speech : गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली. बाळासाहेबांच्या निधनानंतर मातोश्रीवर काय काय घडलं? याचा पाढाचा कदम यांनी सर्वांसमोर वाचला. रामदास कदम म्हणाले, "शिंदे साहेब एक विनंती आहे तुम्हाला..शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं?त्यांची बॉडी मातोश्रीवर किती दिवस ठेवली होती? याबाबत माहिती काढा. मी जबाबदारीने बोलतोय. शिवसेनाप्रमुखांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आहेत. आजही त्या डॉक्टरांना विचारून घ्या. उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांची बॉडी का ठेवली होती? मातोश्रीच्या बाकड्यावर मी आठ दिवस झोपलो आहे. सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी? कोणीतरी सांगितलं, बाळासाहेबांचे ठसे घेतले होते. काय नेमकं होतं? सगळी चर्चा तिथे चालली होती. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं? कधी झालं? त्यामध्ये सही कोणाची होती? सगळी माहिती काढा, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
"तुम्ही आम्हाला काय शिकवता? आम्ही शिवसेना मोठी केली. जेल आम्ही भोगलेत. तुम्ही आम्हाला संपवताय? तुम्ही मनोहर जोशींना संपवलं. तुम्ही दिवाकर रावतेंना संपवलं. तुम्ही गजानन किर्तीकरला संपवलं. तुम्ही रामदास कदमला संपवलं. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे लागला होता..तुम्हाला नेमकं काय हवं होतं? ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांना पन्नास वर्षे साथ दिली. बाळासाहेब गेल्यानंतर त्या नेत्यांना संपवण्याचं काम यांनी केलं, असं म्हणत कदमांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
नक्की वाचा >> "पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीआधीच त्यांना..", DCM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान!
रामदास कदम पुढे म्हणाले, "मराठी माणसाला सन्मान नव्हता. आज मराठी माणूस ताठ मानेनं जगतोय.तो फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच जगतोय. काय केलं उद्धव साहेबांनी. तुमच्या हातात 30 वर्ष महानगरपालिका आहे.राज ठाकरेंच्या पाठीमागे भीकेचा कटोरा घेऊन चाललाय..मला भीक दे,अरे मला भीक दे..ये माझ्यासोबत ये माझ्यासोबत.तुला भीक देतोय की भीक देत नाय..की सोबत येतोय.दोन भाऊ नाही..आणखी एकडे तिकडचे दहा भाव सोबत असले,तर मुंबईचा माणूस उद्धव ठाकरेंना कायमचा गाडल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास माझ्या मनात आहे.
"मी खूप अस्वस्थ आहे. तीस वर्षात माझ्या मुंबईतला मराठी माणूस नालासोपाऱ्याच्या पलीकडे गेली. कल्याण-डोंबिवलीच्या पलीकडे गेली. गिरगावात आमच्या गिरणी होत्या. तिथे पन्नास-साठ मजल्याच्या बिल्डिंग झाल्या. त्या बिल्डिंगमध्ये एकही मराठी माणूस शिल्लक राहिला नाही.तुम्ही तीस वर्ष फक्त टक्क्याचं राजकारण केलं", अशीही टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
नक्की वाचा >> प्रवाशांसाठी खुशखबर! 'ही' एकच APP डाऊनलोड करा, एसटीचं परफेक्ट लोकेशन कळणार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world