उद्धव ठाकरेंशी बातचीत होते मात्र.....एकनाथ शिंदेंनी सगळं सांगून टाकलं

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे एकही संधी सोडत नाही. तसेच एकनाथ शिंदे हे देखील उद्धव ठाकरेंवर हातचे न राखता टीका करताना दिसतात.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. यामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली होती. जून 2022 मध्ये शिवसेनेत ही फूट पडली होती. कालांतराने सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्ह आणि पक्ष हा एकनाथ शिंदे याचा असल्याचा निर्वाळा दिला होता. उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)असे पक्षाचे नाव मिळाले आणि त्यांना पक्षचिन्ह म्हणून मशाल चिन्ह मिळाले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या सगळ्या घडामोडींनंतर एकमेकांवर तुटून पडताना दिसतात.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटात बेबनाव? या दोन घटना सांगतायेत...काहीतरी बिनसलंय!

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे एकही संधी सोडत नाही. तसेच एकनाथ शिंदे हे देखील उद्धव ठाकरेंवर हातचे न राखता टीका करताना दिसतात. महाराष्ट्राचं राजकारण हे इतर राज्यांतील राजकारणापेक्षा वेगळे असल्याचे नेहमी दाखले दिले जातात. इथे राजकारणा पलिकडे मैत्री जपली जाते असे म्हणत त्याची उदाहरणेही दाखवली जातात. अशा वेळी 2 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वितुष्ट आता दूर झालंय का ? ते दोघे एकमेकांशी बोलतात का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. 

हे ही वाचा : मुंबई ठाकरे गटाला मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे होते का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की बोलणे होते मात्र टीव्हीवरून. शिंदे यांनी म्हटले की "उद्धव ठाकरेंशी बातचीत होते मात्र टीव्हीच्या माध्यमातून, ते आम्हाला शिव्याच देतात, आरोप करत राहतात. लाडकी बहीण योजनेवरूनही ते टीका करतात, म्हणतात की ही बोगस योजना आहे. आम्ही जे करतो त्यावरून ते टीका करतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही."

हे ही वाचा : ठाकरे गटामधील मतभेद उघड, वरिष्ठ नेत्याचा एकटे पाडले जात असल्याचा आरोप!

उद्धव ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केल्यास एकनाथ शिंदे काय करणार?

एकनाथ शिंदे यांना पुढे असाही प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे यांनी जर तुमच्यापुढे मैत्रीचा हात केला तर तुम्ही काय करणार ? यावर उत्तर देताना शिंदे यांनी म्हटले की, "ते फेक नरेटीव्ह पसरवण्याचे काम करतात. आजकाल ते योजनेवरून फेक नरेटीव्ही पसरवत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी संविधान बदलणार या मुद्दावरून फेक नरेटीव्ही पसरवले होते."

Advertisement