
समाधान कांबळे, हिंगोली
Hingoli News : लग्नाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी येथे ही घटना घडली आहे. गणेश तनपुरे असं मृत तरुणांचं नाव आहे.
युवकाच्या लग्नाचं आज देवकार्य होतं. देवकार्यासाठी वाघजाळी येथे असलेल्या आई आजी हिला आणण्यासाठी हा तरुण सकाळीच घरून निघाला होता. गणेश तनपुरे हा तरुण आजीच्या गावाजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या आजेगाव येथे पोहोचला. मात्र आजी आणि नातवाची भेट होणे हे नियतीला मान्य नव्हते.

(नक्की वाचा- Govt Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय)
गणेश दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात टिप्पर चालकाने या तरुणास जवळपास 100 मीटर पर्यंत फरफटत नेले, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली.
(नक्की वाचा- रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लागणार; नियमबाह्य भाडे आकारणाऱ्यांची WhatsApp वर करता येणार तक्रार)
लग्न कार्यामुळे घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होते. लग्नाआधी केलं जाणारं देवकार्य आज होत असल्याने घरात तयारी सुरु होती. मात्र काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. या अपघाताची माहिती मिळतात गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world