जाहिरात
This Article is From Sep 21, 2024

'मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले' ठाकरे बंधू भडकले

आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे या ठाकरे भावांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले अशा शब्दात अमित ठाकरेंनी प्रशासनाला फटकारले आहे.

'मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले' ठाकरे बंधू भडकले
मुंबई:

सिनेट म्हणजेच मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. यानंतर आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे या ठाकरे भावांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले अशा शब्दात अमित ठाकरेंनी प्रशासनाला फटकारले आहे. तर यह डर अच्छा है, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारला डिवचले आहे. सिनेटची निवडणूक  22 सप्टेंबरला होणार होती. निवडणूक स्थगित केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने नाराजी व्यक्त केली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निवडणूक स्थगित केल्यानंतर माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 22 तारखेला होणारी सिनेटची निवडणूक सरकारच्या आदेशावरून रद्द करण्यात आली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. डरते रहो, यह डर अच्छा है, लेकीन हम अपने लोकतंत्र के लिए लडेंगे और जितेंग अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी युवा सेनेने चांगली तयारी केली होती. निवडणुकीत पराभव होईल या भितीने ही निवडणूक रद्द केल्याचा आरोप आता शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की...' पाटलांचे थेट आव्हान

आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवला असताना अमित ठाकरेही मागे राहीले नाहीत. त्यांनी ही पत्राद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणतात,  ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशी थेट टिका अमित ठाकरे यांनी केली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; आज बीड आणि धाराशिव बंदची हाक

मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतु, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करून रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते. निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात.नत्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल, असं ही अमित ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात.  

ट्रेंडिंग बातमी - घड्याळाचे काटे फिरणार? अजित पवारांना नवीन चिन्हावर निवडणूक लढावावी लागण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. पण त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला.निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने, त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली होती असेही ते म्हणाले. माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला होता असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, ही अपेक्षा व्यक्त करतो, असे अमित ठाकरे शेवटी म्हणाले.