जाहिरात

आंदोलन विरुद्ध आंदोलन ! महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजप रस्त्यावर

महिला अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी भाजप आंदोलन करणार आहे.

आंदोलन विरुद्ध आंदोलन ! महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजप रस्त्यावर
मुंबई:

बदलापूर प्रकरणात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. तरही जर कोणी बंद केला तर कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने बंद मागे घेतला. पण संपुर्ण राज्यात निषेध आंदोलन केले जाणार आहे. शिवाय मुक मोर्चेही काढले जाणार आहेत. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे महाविकास आघाडीचे बडे नेते सहभागी होणार आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलनही आज शनिवारी सकाळी 11 ते 12 दरम्यान केले जाईल. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महिला अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले आहे. शिवाय बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मादाम कामा रोड, मुंबई येथे आंदोलनात सहभागी होतील.  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही या आंदोलनात नागपूरात सहभागी होणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार

याशिवाय भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर चवदार तळं, महाड येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिवाय भाजपचे आमदार प्रसाद लाड झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, सायन सर्कल येथे आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. बदलापूर प्रकरणावरून विरोध पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. या शिवाय संपूर्ण राज्यातही संतापाची लाट आहे. महाविकास आघाडीने या विरोधात आघाडी उघडली असताना आता भाजपही यानिमित्ताने पुढे सरसावली आहे. त्यामुळे आंदोलन विरूद्ध आंदोलन अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?

उद्धव ठाकरेहे मविआच्या निषेध मोर्च्यात सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजचा शिवसेना भवनाच्या चौकात निषेध केला जाणार आहे. यावेळी काळ्या पट्ट्या लावून निषेध करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना भवनात स्टेज उभारण्यात आले आहे. ते संपुर्ण काळ्या रंगाचे स्टेज निषेधाचे प्रतिक म्हणून उभारण्यात आले. कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचा निषेध असे बॅनरवर लिहीण्यात आले आहे. या वेळी मविआच्या स्थानिक नेतेही उपस्थित राहाणार आहेत.मुंबईत उद्धव ठाकरे मुक आंदोलनात सहभागी होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात मुक आंदोलनात सहभागी होती. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंबेडकर पुतळ्या जवळ हे आंदोलन होणार आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ठाण्यात आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?
आंदोलन विरुद्ध आंदोलन ! महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजप रस्त्यावर
Health Minister Tanaji Sawant's nephew Anil Sawant meet Sharad Pawar for Pandharpur Assembly
Next Article
बंडखोरी होणार? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांकडे