
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजून ही सुटलेला नाही. आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून करण्यात आली होती. पण त्याला शिवसेना शिंदे गटाने जोरदार विरोध केला. या पदासाठी मंत्री भरत गोगावले हे इच्छुक होते. तटकरे यांच्याबाबत शिवसेनेत असलेली नाराजी उफाळून आली. याची थेट तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. जवळपास शंभर दिवस झाले तरी याचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंत्री भरत गोगावले हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते रत्नागिरीच्या मुख्य बस स्थानकाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत आपण आशावादी आहोत. आज ना उद्या ते पद आपल्यालाच मिळेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उदय सामंत हे गेल्या वेळी रायगडचे पालकमंत्री होते. आता ते पद मला मिळावी म्हणून तेच प्रयत्न करत आहेत. असं ही यावेळी गोगावले म्हणाले.
(नक्की वाचा: Political news: 'वादा पूर्ण करायचा नव्हता तर केलाच कशाला', सरकार विरोधात जानकर मैदानात)
यावेळी त्यांनी उदय सामंत यांचे तोंडभरून कौतूक केले. चांगला माणूस कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे उदय सामंत आहे असं ही ते म्हणाले. मला पालकमंत्री करण्या मागे त्यांचे मोठे प्रयत्न आहेत. त्यांच्या या प्रयत्नाना आज ना उद्या नक्की यश मिळेल असं ही ते म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा आहे असं ही त्यांनी यावेळी सांगितले. रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे त्या पदावर आपला दावा असल्याचं त्यांनी सांगितलं.
(नक्की वाचा: Shivsena News: मुंबईत ठाकरे गटाला अजून एक धक्का, आता 'या' नेत्याने सोडली साथ)
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या रायगडमध्ये विस्तवही जात नाही. तटकरे कुटुंबाला शिवसेनेचा टोकाचा विरोध आहे. रायगडचे पालकमंत्रिपद गोगावलेंनाच मिळेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. ते आदिती तटकरे यांना मिळाले. त्यावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्या निर्णयाला स्थिगिती देण्यात आली. त्या दिवसापासून आजपर्यंत पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world