महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या विस्तारात काहींना संधी मिळाली आहे. तर अपेक्षा असतानाही ऐन वेळी काहींच्या पदरात निराशा पडली आहे. त्यामुळे सध्या महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. रवी राणा यांना मंत्रिपदाची आपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी भाजप श्रेष्ठींकडे जोर लावला होता. पण त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. तर भंडारा- पवनी विधानसभेचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद नाकारले गेल्याने उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमदार रवी राणा हे महायुतीत आहेत. त्यांना यावेळी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होता. त्यासाठी त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे जोर लावला होता. शिवाय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही मंत्रिपदासाठी लॉबिंग केली होती. मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव ही घेतले जात होते. पण ऐन वेळी त्यांच्या नावावर काट मारण्यात आली. त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. त्यामुळे ते कमालीचे नाराज झाले. ते शेवटपर्यंत मंत्रिपद मिळावे यासाठी नागपूरात ठाम मांडून होते. पण ज्यावेळी मंत्रिपद मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूर सोडून थेट अमरावती गाठलं.
ट्रेंडिंग बातमी - सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?
पती रवी राणा यांना मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे माजी खासदार नवनीत राणा या ही नाराजी लपवू शकल्या नाहीत. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिंदगी है, समंदर को क्या कम है, वो बता भी नही सकता. और पाणी बनकर आखो मे आ भी नही सकता...जिंदगी है लढाई जारी है... असा व्हिडीओ नवनीत राणा यांना शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय पुढे आपण लढत राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या रिल्सची चर्चा सध्या अमरावतीमध्ये जोरदार पणे सुरू आहे.
भाजपमध्ये नाराजीचे सुर असताना दुसरीकडे शिवसेनेतही नाराजी दिसून आली आहे. शिवसेनेचे नेते तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण ते पाळण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्याने भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत. त्यामुळेच त्यांना राजीनामा अस्त्र वापरले आहे.
ट्रेंडिंग बातमी - वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?
राष्ट्रवादी काँग्रेसनेही छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मारावबाबा अत्राम यांना पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे हे नेतेही नाराज असल्याचे बोलले जात आहेत. छगन भुजबळांनी तर नागपूरात पक्षाच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली. जेष्ठ असूनही संधी मिळाली नाही याबद्दल भुजबळांना आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सर्व नाराजांची आता कशी समजुत काढायची हा प्रश्न नेत्यां समोर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world