राज ठाकरेंसमोरच मनसैनिकांची हाणामारी, चंद्रपुरात तुफान राडा

राज ठाकरे यांनी गुरुवारी राजुऱ्यातून सचिन भोयर आणि चंद्रपुरातून मनदीप रोडे यांची उमेदवारी जाहीर केली.

Advertisement
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

अभिषेक भटपल्लीवार

राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) आदेश दिला की कार्यकर्ते तो शिरसावंद्य मानून काम करतात. राज ठाकरेंसमोर त्यांच्या पक्षात कोणाची चढ्या आवाजात बोलण्याची हिम्मत होत नाही असा दावा केला जातो. मात्र आज चंद्रपुरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला (MNS Vidarbha) सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गुरुवारी चंद्रपुरात आले होते. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर त्यांनी विदर्भाचा दौरा आखला असून मराठवाड्याप्रमाणेच त्यांनी विदर्भातील उमेदवारही जाहीर करण्यास सुरुवात केली. राज ठाकरे यांनी गुरुवारी राजुऱ्यातून सचिन भोयर आणि चंद्रपुरातून मनदीप रोडे यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र काही मनसैनिकांना त्यांचा हा निर्णय आवडला नाही.  

नक्की वाचा: मनसेचं मिशन विदर्भ, किती जागा लढणार ते ही ठरलं, राज ठाकरे ताकद दाखवणार?

चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांनी उमेदवारांची नावे जाहीर करताच नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली. मनसैनिकांचा मुख्य आक्षेप हा  मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या राजुऱ्यातून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर करण्यावरून होता. भोयर हे राजुऱ्यातील नाही ते चंद्रपूरचे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये अशी मागणी मनसैनिकांची होती. राज ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते मग काय मनसैनिक भडकले आणि भोयर समर्थक आणि विरोधक आपापसात भिडले. राज ठाकरे हा सगळा प्रकार हतबलपणे पाहात होते. 

नक्की वाचा: Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? 

मतदारसंघ

उमेदवाराचे नाव

शिवडीबाळा नांदगांवकर
पंढरपूरदिलीप धोत्रे
लातूर ग्रामीणसंतोष नागरगोजे
हिंगोलीप्रमोद कुटे
सचिन भोयरसचिन भोयर
मनदीप रोडेमनदीप रोडे


आतापर्यंत सहा उमेदवारांची घोषणा

मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असून राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी शिवडीतून बाळा नांदगांवकर आणि पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे आणि हिंगोलीतून प्रमोद कुटे यांच्या नावांची घोषणा केली होती. 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी राजुऱ्यातून सचिन भोयर आणि चंद्रपुरातून मनदीन रोडेंच्या नावाची घोषणा केली.