जाहिरात

काँग्रेस आमदारानं हायकमांड विरोधात थोपटले दंड, स्वतःची उमेदवारी केली जाहीर 

'मला जरी उमेदवारी मिळाली नाही तरी मी निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने तिकीट दिलं नाही दिली तरी मी निवडणूक लढवणार आहे. जनता माझ्यासोबत आहे.'

काँग्रेस आमदारानं हायकमांड विरोधात थोपटले दंड, स्वतःची उमेदवारी केली जाहीर 
मुंबई:

'ठाकरे गटानं मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय केला. ठाकरे गटानं माझा फंड अडवून धरला म्हणून मी विकासकामं करू शकलो नाही. 
माझ्यावर अन्याय होत होता. पण हायकमांड मला गप्प राहायला सांगायचे. ठाकरे गटाचे नेते हे बिल्डर लोकांची दलाली करतात. काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती ही अनैसर्गिक आहे, ती आज असेल तर उद्या नसेल', असं म्हणज काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसवर तोफ डागलीये. 

ते पुढे म्हणाले, असं होत असेल तर हा कार्यकर्त्यांचा पराभव आहे. पक्षाच्या बैठकीला दुसरा कोणता नेता येत असेल तर ते चुकीचं आहे. मी काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे. काँग्रेसनं मविआमध्ये आपल्या आमदारासाठी लढण्यासाठी हिंमत ठेवावी. पण मित्रपक्षाला खूश करण्यासाठी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना संपवत चालली आहे. आणि हे दुर्भाग्य पूर्ण आहे. असं देखील सिद्दिकी म्हणाले. 

मी काँग्रेसचा आमदार आहे. मी नक्कीच निवडणूक लढवणार, काँग्रेसला यावर भूमिका मांडावी लागेल. वरुण सरदेसाईंना विचारावं की, ते बैठकीला का आले ? ते ठाकरे गटात खूश नाहीत का? का ते काँग्रेसमध्ये येत आहेत. इतर नेत्यांना पक्षाच्या बैठकीला बोलावतात हे चुकीचं आहे. पण मला बोलावलं नाही. जनता सर्व बघतेय, असं ते म्हणाले. मला जरी उमेदवारी मिळाली नाही तरी मी निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने तिकीट दिलं नाही दिली तरी मी निवडणूक लढवणार आहे. जनता माझ्यासोबत आहे. कोणत्या पक्षासोबत जाऊन लढायचं हे मी जनतेत जाऊन ठरवणार. 2019 ला मी ठाकरे गटाच्या उमेदवाराला हरवलं होतं. तेव्हा जनता माझ्यासोबत होती. ठाकरे गटानं कोणताही विकास केला नाही. मी विकासकामं केली. ठाकरे गटाचे काही नेते पूर्ण वेळ बिल्डरसोबत असतात अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

नक्की वाचा - Shivsena Vs BJP : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

मी मविआचा विरोध असा केला की माझ्या मतदारसंघातच उबाठाने माझ्यावर अन्याय केला. माझ्या मतदारसंघात उद्घाटन असायचे पण मला बोलवले नाही जायचे. मविआच्या आमदाराला जो फंड मिळायला पाहिजे होता तो फंड मला मिळायचा नाही . मी सर्व गोष्टींची तक्रार हायकमांडकडे करायचो पण काही उत्तर नाही मिळायचं, असं सिद्दिकी म्हणाले. नाना पटोले म्हणतात की मविआ म्हणून ते पुढे जाणार आहेत, तर मग जा पण तुमच्या आमदारांसाठी पण लढा ना. तुमच्यासारखे नेते आमच्यासाठी नाही लढले तर मग आम्ही कुठे जाणार? मी अनेकवेळा माझ्यावर जो अन्याय झाला त्याची तक्रार हायकमांडकडे करायचो. अनिल परब माझ्यावर अन्याय करायचे पण मला दिल्लीतून फोन यायचा की तू गप्प बस तुझ्यामुळे मविआमध्ये फूट पडेल, असं ते म्हणाले.

क्रॉस वोटिंगचं आता त्यांना एक कारण मिळालं. पक्षाने मला बैठकीत पण बोलवलं नाही . पण पक्षाने जे सांगितले ते मी केले. पक्षाने तो कागद दाखवावा की जो त्यांनी मला मतदान करायला दिला होता . जे पक्षाने सांगितले ते मी केले. काही पक्षाच्या नेत्यांना वाटत की मला हटवलं तर त्यांच्या रस्त्यातील काटा बाजूला होईल. आतापर्यंत माझ्यावर अन्यायच झाला पण. मला अपेक्षा आहे की माझ्या सोबत न्याय व्हावा. 'उम्मीद पर दुनिया कायम है,' असं ते म्हणाले.

झिशान सिद्दीकींचं टीकास्त्र...
काँग्रेस आमदार झिशान सिद्दिरी यांनी ठाकरे गटासह काँग्रेसवर तोफ डागलीय. ठाकरे गटानं मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय केला. 
ठाकरे गटानं माझा फंड अडवून धरला म्हणून मी विकासकामं करू शकलो नाही. माझ्यावर अन्याय होत होता. पण हायकमांड मला गप्प राहायला सांगायचे, अशा शब्दात झिशान सिद्दिकींनी काँग्रेस हायकमांडविरोधात दंड थोपटलंय. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत वरुण सरदेसाई काँग्रेस नेत्यांना भेटायला गेले होते. काँग्रेसकडून वांद्र पूर्व मतदारसंघात झिशान सिद्दीकी आमदार आहेत, याच मतदार संघात ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई इच्छुक आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
आनंदराव अडसुळांचे पुनर्वसन, पण मुलावर होणार अन्याय? अमरावतीमध्ये नवा ट्विस्ट
काँग्रेस आमदारानं हायकमांड विरोधात थोपटले दंड, स्वतःची उमेदवारी केली जाहीर 
ajit pawar reaction on badlapur physical assault case  political news
Next Article
Ajit Pawar : 'आरोपींचे कापून टाकलं पाहिजे', बदलापूरच्या घटनेवर अजित पवार धारधार वक्तव्य