जाहिरात

'लाडक्या बहिणींचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही' फडणवीसांवर स्पष्टीकरणाची वेळ का आली?

महायुती सरकारकडून लाडक्या बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. 

'लाडक्या बहिणींचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही' फडणवीसांवर स्पष्टीकरणाची वेळ का आली?
Devendra Fadnavis
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकांची नव्या रणनितीसह विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. याच रणनितीचा भाग म्हणून राज्याच्या अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' योजना सादर करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करणारी ही योजना गेमचेंजर असेल, असा विश्वास महायुतीला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेचा सध्या जोरदार प्रचार करत आहेत. हा प्रचार सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले फडणवीस ?

कोणी तरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं ही हे पैसे दिल्यानंतर आम्ही परत घेऊ तर हे असं अजिबात होणार नाही. हे सर्व पैसे तुमच्या अकाऊंटला येणार आहेत. त्यामुळे ते कुणीही घेऊ शकत नाही. तुम्ही ते पाहिजे तेंव्हा काढू शकता, खर्च करु शकता' असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. ते जळगावमधील कार्यक्रमात बोलत होते. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये मिळणार मात्र काही लोकांच्या पोटात हे दुखत आहे.  आमच्या बहिणीच्या संसाराला आमचाही थोडाफार हातभार लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. बहिणींनो सावत्र भावांपासून सावध राहा, तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात ते त्यांच्या पोटात दुखत आहे  हे त्रिमूर्तीचे सरकार आहे तोपर्यंत कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही, असं फडणवीसांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - जरांगे पाटलांकडून सतत होत असलेल्या हल्ल्यावर फडणवीसांनी सोडलं मौन!
 

स्पष्टीकरण देण्याची वेळ का?

लाडकी बहीण योजनेचा महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्याचवेळी आमदार रवी राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.  'आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, असा दम रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.  ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं रवी राणा म्हणाले. 

रवी राणा यांनी याबाबत नंतर सारवासारव केली. बहीण-भावाच्या नात्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने बोललो. विरोधक माझ्या वक्तव्याचा बाऊ करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं.  या सारवासावीनंतरही राणा चांगलेच अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षानं महायुतीच्या सरकारलाही लक्ष्य केलंय. त्यामुळे जळगावमधील भाषणात देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com