जाहिरात

कोल्हापुरात भाजपला बळ मिळणार, मोठा मासा लागला गळाला

इचलकरंजी विधानसभा मतदार संघात प्रकाश आवाडे यांची मोठी ताकद आहे. त्यांनी आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे.

कोल्हापुरात भाजपला बळ मिळणार, मोठा मासा लागला गळाला
कोल्हापूर:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला बळ मिळणार आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या बरोबर युवा नेते राहुल आवाडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते समरजित घाडगे यांनी नुकताच भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला दिलासा तर मिळालाच आहे पण पक्षाची ताकदही वाढली आहे. आवाडे हे मुळचे काँग्रेसचे आहेत. मात्र मागिल निवडणुकीत ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर हे ही उपस्थित होते. हाळवणकर यांचा पराभव करून आवाडे हे विधानसभेत पोहचले होते. हाळवणकर यांनाही आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाने त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. 

ट्रेडिंग बातमी - अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?

इचलकरंजी विधानसभा मतदार संघात प्रकाश आवाडे यांची मोठी ताकद आहे. त्यांनी आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. कोल्हापुरात सध्या काँग्रेसने भाजप समोर मोठे आव्हान उभे केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून काँग्रेस खासदार विजयी झाले होते. तर हातकणंगलेमध्ये शिवसेनेचा उमेदवार थोड्या मताने विजयी झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आवाडे यांचा होणार पक्ष प्रवेश भाजपला बळ देणारा ठरेल. 

ट्रेंडिंग बातमी - 'आम्ही सर्व जागांवर तयारी करतोय, युती आमच्या शर्तींवर होते' पाटलांच्या बोलण्याचा अर्थ काय?

एकीकडे कागलमध्ये भाजपनेते समरजित घाडगे यांनी पक्षाला रामराम केला. तो पक्षासाठी मोठा धक्का होता. कागल मतदार संघ हा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार आहे. त्यामुळे इथून समरजित घाडगे यांना भाजपकडून निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे त्यांनी ऐन वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. घाडगे यांना मानणारा मोठा वर्ग कोल्हापुरात आहे. त्याचीच भरपाई आता कुठेतरी भाजपने केली आहे. आगामी निवडणुकीत आवाडे यांच्या प्रवेशाचा फायदा भाजपला होईल अशी चर्चा आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com