महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून आपली तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राशपच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीबाबत रणनिती आखण्यात आली. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे याबाबत चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर पुढच्या तीन महिन्याचा महाविकास आघाडीचा कार्यक्रम काय असे हेही निश्चित करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मविआचे तीन उमेदवार मैदानात आहेत. निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली गेली आहे. तीन ही जागा कशा जिंकता येतील यावर चर्चा करण्यात आली. शिवाय आपल्याकडे पुरेस संख्याबळ असल्याचा दावाही यानिमित्ताने मविआने केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'
विधान परिषद सोबत विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागावाटप संदर्भात चर्चा सुरू केल्या जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जागावाटपा संदर्भात प्राथमिक चर्चा या बैठकीत झाली आहे. लवकरच मुंबईमध्ये राज्यभरातील तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. एक जाहीर भव्य सभा ही घेतली जाईल. लोकसभा निवडणुकीत मविआला मोठे यश मिळाले होते. या सभेच्या माध्यमातून जनतेचे आभार मानले जातील.या सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल.
ट्रेंडिंग बातमी - वजन कमी करण्यासाठी काय कराल? 'या' फळाचं करा सेवन
येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं? महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात असतील? या सगळ्या संदर्भात या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष यांची जिल्हा जिल्हास्तरावर एकजूट निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचा आयोजन केले जाणार आहे. महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास आपण लोकसभेप्रमाणे विधानसभेला ही चांगले यश मिळू शकतो हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - वाईन शॉप बाहेरच ओपन बार, डोंबिवलीत चाललंय काय?
दरम्यान मविआतले सर्व पक्ष एकत्र आहेत. निवडणुकीलाही आम्ही एकत्रीत सामोरे जावू असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्या जिल्ह्यात मविआचे मेळावे घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. मविआ आता अॅक्शन मोडमध्ये असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याला दुजोरा देत मविआ एकसंध पणे लढेल असे सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world