पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील. या सरकारचा हा शेवटचा अर्थ संकल्प असणार आहे. त्यानंतर दोन तीन महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर होण्या आधी आजचा दिवस विरोधक गाजवतील असे चित्र आहे. गेल्या काही काळात झालेल्या विविध घटनांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्याचेच प्रतिबिंब आज विधानसभेत आणि विधानपरिषदेत दिसण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेत 'पोर्शे'अपघात प्रकरण गाजणार
विधानसभेच्या कामकाजामध्ये लक्षवेधी सुचनांच्या माध्यमातून सरकारला घेरले जाण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात एका अल्पवयीन तरूणाने भरधाव पोर्शेकारने दोघांना चिरडले होते. त्यानंतर त्या मुलाला तातडीने जामीन मिळाला होता. रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आली होती.या संपुर्ण प्रकरणात अनेक चुका सरकारच्या विशेष करून गृह खात्याकडून करण्यात आल्या होत्या. यावर बोट ठेवत शिवसेना आमदार सुनिल प्रभू, विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सुचना मांडली आहे. या माध्यमातून गृह विभागाच्या कारभारावर बोट ठेवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांन धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. शिवाय पुणे पोलिस आयुक्तांच्या हाकालपट्टीची मागणीही विरोधक करतील.
ट्रेंडिंग बातमी - भाजप प्रवेशाची चर्चा, खडसे कुटुंबाचं मोठं पाऊल, 'ते' प्रकरण मिटणार?
आईस्क्रीमध्ये बोट सापडल्याचे प्रकरण
मुंबईच्या मालाड परिसरात एका डॉक्टरने ऑनलाईन आईस्क्रीम मागवले होते. त्यात मानवी बोटाचा तुकडा आढळला होता. हे याबाबकची लक्षवेधी सुचना विधानसभेत माडंली जाणार आहे. या प्रश्नावरूनही विधानसभेत गोंधळ होण्यासाठी शक्यता आहे. ऑनलाईन ऑर्डरमध्ये अशा पद्धतीने पदार्थ मिळणार असतील तर ते नागरीकांच्या जिवा बरोबरच आरोग्याशी खेळल्या सारखे आहे. त्यामुळे यामाध्यमातून ऑनलाईन विक्रीवरच आक्षेप घेत सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाला धारेवर धरले जाईल.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची कोंडी होणार?
सरकार हे शेतकऱ्यां बाबत उदासीन आहे. सततची नापिकी, दुष्काळ, टंचाई, अवकाळी, कर्जबाजारीपणा, कृषी विभागाच्या अपूऱ्या सोयी सुविधा यामुळे शेतकरी हे मेटाकुटीला आले आहेत. असा विरोधकांनी आरोप केला आहे. या प्रश्नावर विरोधकांकडून 293 चा प्रस्ताव सरकार विरोधात आणला आहे. या प्रस्तावात हे आरोप करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्याकडे सरकार सोयिस्कर पणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. पिक विमा योजना असेल किंवा हर घर जल योजना असेल या योजनांचा कसा बट्ट्याबोळ झाला आहे यावर ही विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारतील. कांद्या वरील निर्यात बंदी, शेती मालाला भाव नसणे हे मुद्देही विरोधकांनी घेतले आहेत. त्यामुळे अर्थ संकल्पा आधी सरकारची कोंडी करण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे आजचा दिवस गाजणार हे निश्चित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world