Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. रविवारी महाविकास आघाडी आणि भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत मोठमोठ्या घोषणा केल्या. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या महाराष्ट्रात सभांचा धुरळा सुरू आहे. नरेंद्र मोदींसह अमित शहा आणि दुसरीकडे राहुल गांधीदेखील महाराष्ट्रात सभा घेत आहेत.
राज ठाकरे भाषण Update
विधानसभा निवडणुकीतील मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची मुंबईतील मालाडमध्ये सभा सुरु आहे. या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांना गंभीर विषयांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका केली.
माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. ते 48 तासांमध्ये महाराष्ट्र साफ करतील, पण राज्यकर्त्यांना गंभीर विषयाकडे बघायला वेळ नाही. आम्ही आमच्या खुर्च्यांमध्ये गुंतलोय, अशी टीका राज यांनी केली.
मतदारांसाठी सोन्याच्या बांगड्या?
मुंबईतील दहिसर पश्चिम येथे स्टॅटिक सर्व्हिलन्स ( SST ) पथकाने 1.43 कोटी रुपये किमतीचे 1.95 किलो सोने जप्त केले आहे. यामध्ये तब्बल 1.95 किलो वजनाच्या सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मतदारांना प्रभावित करण्यासाठी सोन्याच्या बांगड्या नेल्या जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतीय. दहिसर पश्चिमेच्या अवधूत नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
'भाजपा खासदाराच्या प्रचारावर बंदी घाला'
भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अलका लांबा यांनी केली आहे. निवडणूक आयोगाकडं काँग्रेस पक्षानं ही मागणी केलीय. महिलांना धमकवल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर एफआयआर दाखल करुन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, याबाबत पोलिसांनाही निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Live Update : महायुतीकडून मुंगेरीलालचे हसीन सपने - छत्रपती संभाजी राजे
भारतीय जनता पार्टी कडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर केला जात आहे यावर जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उपयोजक टीका केली. ते म्हणाले अजून निवडणूक व्हायची आहे निकाल लागायचा आहे मात्र महायुतीकडून मुगेरी लालचे हसीन सपने पाहायला जात आहे.
Live Update : समीर भुजबळ यांचा बैलगाडीतून प्रचार...
नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी मतदार संघातील दहिवाळ गावातून चक्क बैलगाडीतू प्रचार फेरी काढली.यावेळी रॅलीवर जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली.
Live Update : फक्त विरोधी पक्षांच्या बॅगा चेक केल्या जातात की काय? - संजय राऊत
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या उतरवलेल्या बॅगांचे चित्रण दाखवण्यात आलं. दोन तासांसाठी आलेले एकनाथ शिंदे यांच्या बारा बॅग होत्या. त्यांचे सुरक्षारक्षक व्यवस्थित त्यावेळेला सांभाळत होते. Live Update : फक्त विरोधी पक्षांच्या बॅगा चेक केल्या जातात की काय? - संजय राऊत
Live Update : मी सांगतोय निवडणूक झाल्यावर भाजपसोबत पुन्हा गटबंधन होणार - प्रकाश आंबेडकर
काँग्रेसची साथ सोडणार नाही असं शिवसेना ठाकरे गटाने लिहून दिलंय का? मी सांगतोय निवडणूक झाल्यावर भाजपसोबत पुन्हा गटबंधन होणार - प्रकाश आंबेडकर
Live Update : भांडूपमध्ये खुल्या गटारात बुडून दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू
भांडुपमध्ये खुल्या गटारात बुडून एक दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे मृत मुलाचे नाव आहे. काल संध्याकाळी या ठिकाणी हा मुलगा खेळत होता. खेळत असताना तो या गटारात पडला आणि बुडाला. एक दीड तासाने जेव्हा कुटुंबाने शोधाशोध केली तेव्हा गटारात या मुलाचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र
याला पालिका जबाबदार असून या अगोदर वारंवार तक्रार करून ही गटार साफ केले गेले नाही, गटार खुले ठेवले असल्याने पालिका याला जबाबदार असल्याचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
Live Update : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मंगळवारी महाराष्ट्र दौ-यावर
राहुल गांधी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा. चिखली येथे चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहे. याशिवाय दुपारी ३.३० वाजता ते गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोपाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
Live Update : 16 बंडखोर 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली कारवाई
16 बंडखोर 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबीत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली कारवाई | NDTV मराठी#Congress #vidhansabhaelection2024 #NDTVMarathi pic.twitter.com/Peta1y8Uh5
— NDTV Marathi (@NDTVMarathi) November 11, 2024
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा कधी आहेत?
पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पुणे, सोलापूर , चिमूर ( चंद्रपूर ) येथे 12 नोव्हेंबरला सभा
त्यानंतर पीएम मोदी यांची 14 तारखेला मुंबई, रायगड येथे सभा होणार
Live Update : राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज
राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवार व शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज वर्तवली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
Live Update : सुप्रिया सुळेंचा पुण्यातील पत्रकारांशी संवाद
Live Update : कसा असेल आजचा प्रचार, कोण कुठे सभा गाजवणार?
आज कोणाच्या कुठे सभा
देवेंद्र फडणवीस सभा आणि रोड शो- सकाळी 9.30 वाजता
गोंदिया- दुपारी 1 वाजता आमगाव देवरी येथे देवेंद्र फडणवीसांची सभा - दुपारी 12 वाजता
नागपूर- दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो - दुपारी 3 वाजता
राज ठाकरे सभा
सायंकाळी 5 वाजता मालाड येथे सभा
सायंकाळी 6.30 वाजता दहिसर येथे सभा
उध्दव ठाकरे सभा
यवतमाळ- दुपारी 12 वाजता वणी येथे सभा
यवतमाळ - दुपारी 2 वाजता वाशिम येथे सभा.
जळगाव- दुपारी 3 वाजता उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ चाळीसगांव येथे सभा
जळगाव- सायंकाळी 6 वाजता प्रभाकर सोनवणे यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिर्डी- दुपारी 1.30 वाजता श्रीरामपूर येथे सभा
शिर्डी- दुपारी 3 वाजता नेवासा येथे सभा
शरद पवार सभा
जळगाव- सकाळी 10 वाजता सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ पारोळा येथे सभा.
जळगाव- दुपारी 1 वाजता मुक्ताईनगर येथे रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी सभा
जळगाव- जामनेर येथे दिलीप खोडपे यांच्या प्रचारासाठी सभा
जळगाव- धरणगाव येथे गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी सभा
धुळे- शिंदखेडा येथे संदीप बेडसे यांच्या प्रचारासाठी सभा
अजित पवार सभा
नवापूर- दुपारी 1 वाजता भरत गावित यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची खांडबारा येथे सभा.
अमरावती- अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर.मोर्शी येथे दुपारी 2 वाजता देवेंद्र भुयार यांच्या प्रचारासाठी पवारांची जनसंवाद रॅली असणार आहे.
नांदेड- सायंकाळी 6.30 वाजता लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्क आणि खारघर येथे सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्क आणि खारघर येथे सभा होणार आहे.
Live Update : नवे CJI संजीव खन्नांच्या शपथ विधी सोहळ्याला सुरुवात...
नवे CJI संजीव खन्नांच्या शपथ विधी सोहळ्याला सुरुवात...
Live Update : एक एकरात आंतरपीक घेऊन युवा शेतकऱ्याचा लाखोंचा नफा
एक एकरात आंतरपीक घेऊन युवा शेतकऱ्याचा लाखोंचा नफा
वाशिमच्या खंडाळा खुर्द येथील अल्पभूधारक युवा शेतकरी आकाश सुर्वे यांनी पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या एक एकर शेतात आंतरपीक पद्धतीने पानगोभी, फुलगोभी, वांगे, दोडके, सांबार मिरची यासारख्या विविध फळ भाज्या पिकवून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. भाजीपाला पिकांच्या या पद्धतीमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे आणि इतर शेतकऱ्यांसमोर नवा मार्ग खुला केला आहे.
मी चोऱ्या केल्या असत्या तर माझ्याही मागे ईडी लावली असती - जानकर
मी जर घोटाळा केला असता चोऱ्या केल्या असत्या तर माझ्याही मागे ईडी लावली असती मला म्हणले असते तुम्हाला आमच्याबरोबर राहावं लागेल नाहीतर तो आत तुरुंगात टाकू..मारुतीच्या साक्षीने सांगतो महादेव जानकर भ्रष्टाचारी नाही.असं म्हणत महादेव जानकर यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.ते बारामती तालुक्यातील कन्हेरीत बोलत होते.
Live Update : 17 तारखेला BKC मध्ये मविआची समारोप सभा, प्रियांका गांधी उपस्थित राहण्याची शक्यता
महाविकास आघाडीची विधानसभा समारोप एकत्र प्रचार सभा BKC मध्ये घेतली जाणार आहे. बीकेसीमध्ये मुंबईतील सर्व उमेदवाराची प्रचार सभा होणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. बीकेसीमधील महाविकास आघाडीच्या सभेला प्रियांका गांधी येण्याची शक्यता आहे.