जाहिरात

Big News: 'देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवतायत', मोठा बॉम्ब कुणी टाकला

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे.

Big News: 'देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवतायत', मोठा बॉम्ब कुणी टाकला
अहिल्यानगर:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत. मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. सोबतच प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केलं आहे. पण हे आवाहन त्यांनी कुणाला केलं आहे हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण त्याही पुढे जावून त्यांनी एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्यांचं काम ते करत असल्याच जरांगे यांनी आरोप केला आहे. त्यासाठी फडणवीस यांनी प्रत्येक मराठा मंत्र्यां सोबत त्यांचा मर्जीतील ओएसडी दिला आहे  असं ही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आतल्या गाठीचा आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे ,अजित पवार , अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवर त्यांनी डाव टाकल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे सरकारमधील सर्व मराठा मंत्र्यांनी आणि नेत्याने देखील सावध व्हा असं जरांगे म्हणाले.

नक्की वाचा - Bhaskar Jadhav: 'भिडा, नडा, एकटा बास', ब्राम्हण समाज अन् भास्कर जाधवांचं स्टेटस चर्चेत का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीस कोणाचेच काम करत नाहीत. गोरगरीब असो ओबीसी असो की मराठा कोणाचेही आरक्षण किंवा काम ते पटकन करत नाहीत. आता त्यांनी ओबीसीसाठी लढणार असल्याचं म्हटलं आहे. मग मराठ्यांसाठी कोण लढणार? असा सवाल उपस्थित करत गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसींच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केली असल्याचा अंदाज आहे असं ते म्हणाले.  मात्र मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Vande Bharat : आज नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ, बुकिंगपूर्वी या 5 गोष्टी माहीत असायला हव्यात

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे. जिथे ओबीसींचे मंत्री आहे तिथे भाजपच्या मराठा कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी ओबीसी मंत्री आहेत, तिथले ओबीसी चिल्लर नेते येऊन म्हणत आहेत, तुम्हाला काम देऊ का? असं जरांगे यांनी म्हटल आहे. अशी परिस्थिती असेल तर पक्ष कसा वाढायचा असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणीस यांना केला आहे. त्याचबरोबर ज्यांना त्रास होतो त्यांचे नाव देखील मी भविष्यात सांगेल, मात्र जिथे मराठा पालकमंत्री आहेत तिथे ओबीसींना त्रास होतो का असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com