एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याला खडसे यांनीही दुजोरा दिला आहे. खडसे भाजपमध्ये जाणार असल्याने त्यांची कन्या रोहिणी खडसेही राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी होणार अशी चर्चा आहे. शिवाय खासदार रक्षा खडसे यांनीही रोहिणी यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. रोहिणी यांनी भाजपमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केले आहे. त्यावर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रीया देत एका वाक्यात विषय संपवला आहे. त्यामुळे खडसे कुटुंबात पुढे नक्की काय होणार याची चर्चा रंगू लागली आहे.
रोहिणी खडसेंचा निर्णय काय?
रोहिण खडसे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. वडीलां बरोबर त्या राष्ट्रवादीत आल्या होत्या. त्यानंतर खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोहिणी खडसेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात रक्षा खडसे यांनीही पाणी टाकले. त्यामुळे रोहिणी खडसे भोवतीही संशयाचे वातावरण निर्माण झाले. रोहिणी खडसे यांनी आपण कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही. याच विचारसरणी बरोबर या पुढे काम करत राहाणार आहे. शरद पवार, जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे. त्यामुळे रक्षा खडसे काय म्हणतात हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही हेच स्पष्ट झाले आहे.
खासदार रक्षा खडसे काय म्हणाल्या?
रोहिणी खडसेंना व्यक्तीगत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आमच्या घरात कोणावरही दबाव नाही. त्यांनी शरद पवारांबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादीमध्येच राहाण्याचा निर्णय घेत असतील. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आले आहे. पण आम्ही भविष्यात प्रयत्न करू की त्यांनी भाजपमध्ये येवून काम करावे. त्या भाजपमध्ये आल्या तर चांगली गोष्ट आहे. असे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश कधी?
एकनाथ खडसे यांनी आपण भाजप प्रवेश करणार हे जाहीर केले आहे. पण त्यांच्या प्रवेशाचा मुहुर्त अजूनही ठरलेला नाही. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि खडसेंचे कट्टर विरोधक गिरीश महाजन या प्रवेशा बाबत नाराज असल्याचे समजते. त्यामुळे खडसे यांचा भाजप प्रवेश लांबल्याचे बोलले जात आहे. हा प्रवेश लवकरच होईल असं सांगितलं जात आहे. निवडणूका असल्याने केंद्रीय नेते व्यस्थ असल्याने प्रवेशास उशिर होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world