
विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तारुढ महायुतीच्या पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. भाजपानं दीडशे प्लस जागा लढवण्याचं ध्येय ठरवलं आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नव्वद जागा लढवण्याची तयारी सुरु केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यातही याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या सर्व राजकीय गदारोळात अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया नेटवर्कवर केलेल्या पोस्टमध्ये भारतीय जनता पार्टीनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला त्यांच्या सूत्रांच्या आधारावर दिला आहे. जपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळतील. कसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेडची लढत यंदा राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार आहे.आपण या लढतीसाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हंटलंय. रोहित पवार यांची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : 'या' पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर )
रोहित पवारांची संपूर्ण पोस्ट वाचा
एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय.
एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 10, 2024
#कर्जत_जामखेड संदर्भात तर "कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको", असं सांगितल्याने #कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या #महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर #स्वाभिमान आणि #निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world